शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2024 Maharashtra Board: बारावीत ९३.३७ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण, 'कोकण'च्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली
2
Arvind Kejriwal : "देशातील लोक पाकिस्तानी आहेत का?"; अरविंद केजरीवालांचा अमित शाहांवर पलटवार
3
“RSS चा स्वयंसेवक होतो, पुन्हा संघटनेत काम करायला तयार आहे”; हायकोर्ट जजने थेट सांगितले
4
कलम ३७० हटल्यानंतर नवा रेकॉर्ड बनला; दहशतवाद्यांचा गड उद्ध्वस्त करून लोकशाही अवतरली
5
वडिलांना वाढदिवसाचे सरप्राइज द्यायचे राहिले, त्या आधीच देवाने...! ससूनच्या शवागारात आईचा आक्रोश
6
...म्हणून मी पोलीस स्टेशनला गेलो; पुणे अपघात प्रकरणी NCP आमदाराचा मोठा खुलासा
7
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
8
'बाबा, तुमची स्वप्ने, माझी स्वप्ने', राजीव गांधींच्या पुण्यतिथीला राहुल गांधी झाले भावूक, जुना फोटो केला शेअर
9
"दोन मुडदे पडले असताना तुम्ही त्याला पिझ्झा खायला घालता"; पुणे पोलीस आयुक्तांवर संतापले संजय राऊत
10
“६ जूनपर्यंत आरक्षण द्यावे, आंदोलन बंद होणार नाही तर...”; मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
11
₹३३९ वरून ₹४८३० वर पोहोचला 'या' सरकारी कंपनीचा शेअर, PM मोदींनीही केलेला उल्लेख 
12
Income Tax स्लॅबमध्ये येत नसाल तरी भरा ITR; भविष्यात मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या
13
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
14
कार्तिक आर्यनसोबत हेमांगी कवी शेअर करणार स्क्रीन; 'चंदू चॅम्पियन'मध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका
15
राजस्थानहून आलेल्या मजुराचा मुलगा, सांगलीच्या आश्रमशाळेत शिकला, बिरजू IAS अधिकारी बनला 
16
हॉरिबल! आठ महिन्यांचे बाळ गच्चीवर पडलेले, लोकांनी आईला एवढे ट्रोल केले, तिने आयुष्यच संपविले
17
आईसोबत सतत फिरते मग शाळेत जाते कधी? ऐश्वर्याने दिलं ट्रोलर्सला उत्तर
18
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
19
तुमच्या आयुष्यातील प्रश्न सुटत नाहीयेत? भगवान बुद्ध सांगताहेत कायमस्वरूपी उपाय!
20
Nrusimha Jayanti 2024: उत्तराखंडच्या नृसिंह मंदिरातील मूर्तीचा थेट संबंध प्रलयाशी? वाचा रोचक माहिती!

घरी जाताना सोबत येऊ शकतो कोरोना, संसर्ग टाळण्यासाठी प्रवासादरम्यान 'अशी' घ्या काळजी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 6:46 PM

घराबाहेर पडल्यानंतर तुम्ही स्वतःच्या आरोग्याबाबत लहान सहान गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे.

(image credit- The daily star)

लॉकडाऊनमध्ये अनेकांना आपापल्या घरी किंवा गावी जायची ओढ लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत.  त्यामुळे तुम्ही संबंधित प्रशासकीय यंत्रणेला अर्ज करून आपल्या इच्छित स्थळी पोहोचू शकता. घराबाहेर पडल्यानंतर तुम्ही स्वतःच्या आरोग्याबाबत लहान सहान गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. लॉकडाऊनमुळे अडकलेल्या लोकांना आपापल्या घरी पोहोचवण्यासाठी रेल्वे सुरू करण्याच आल्या आहेत. पण  सध्याच्या काळात प्रवास करणं जोखमीचं ठरू शकतं.  त्यामुळे जर तुम्ही कुठेही जात असाल तर काळजी घेणं गरजेंच आहे. 

बाहेरचे पदार्थ खाणं टाळा

बाहेरील खाद्यपदार्थ खाणं शक्यतो टाळा. एखाद्या कोरोना संक्रमित व्यक्तीचा त्याला स्पर्श झालेला असू शकतो. प्रवासादरम्यान किंवा प्रवासानंतरही कुठेही सार्वजनीक ठिकाणी खाणं टाळा. 

देवाण- घेवाण टाळा

प्रवासात सहप्रवाशांकडून कोणतीही वस्तू घेऊ नका, कारण वस्तूंमार्फतही कोरोनाव्हायरस पसरू शकतो. त्यामुळे  लहान सहान गोष्टी इतरांच्या घालून घेऊ नका. जर एकाद्या वस्तूला हात लावावा लागला तर लगेच सॅनिटाईज करून घ्या.आपल्या सामानाला स्पर्श करण्यापूर्वी सॅनिटाइज करून घ्या. ते शक्य नसल्यास सामानाला हात लावल्यानंतर हात स्वच्छ करा.(आता अँटीजन टेस्टमुळे १५ मिनिटात कोरोनाची तपासणी होणार; कशी होते 'ही' टेस्ट जाणून घ्या)

मास्क, ग्लोव्हज घाला

प्रवासात मोबाइलचा कमीत कमी वापर करा, मोबाइलवरही कोरोनाव्हायरस असू शकतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मास्क जरूर लावा. कोरोना संक्रमित व्यक्तीमध्ये लक्षणं दिसत नसतील, तर असा व्यक्ती इतरांना संक्रमित करू शकतो, शक्यतो  हातात ग्लोव्ह्ज घाला. संपूर्ण शरीर झाकलेलं असू द्या. त्यानंतर प्रवासादरम्यान वापरलेले कपडे, रुमाल, बॅग, पिशव्या या वस्तू धुवून टाका.(फ्फुसांच्या आजारांचं कारण ठरू शकतं चेस्ट इन्फेक्शन; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय)

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealth Tipsहेल्थ टिप्सCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस