मिठाईच्या एका पीसनं किती वाढतं तुमचं वजन? जाणून एका पीसमध्ये किती असतात कॅलरी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 14:27 IST2024-12-26T14:27:14+5:302024-12-26T14:27:59+5:30
Weight Loss : साखर जी मिटाईतील मुख्य तत्व असते, त्यात कॅलरी भरपूर असते. जर तुम्हाला तुमचं वजन कंट्रोल करायचं असेल तर मिठाई आणि साखर खाणं सोडावं लागेल.

मिठाईच्या एका पीसनं किती वाढतं तुमचं वजन? जाणून एका पीसमध्ये किती असतात कॅलरी!
Weight Loss : वेगवेगळ्या प्रकारच्या मिठाई खाणं अनेकांना आवडतं. बरेच लोक रोज जेवण झाल्यावर किंवा असेही न विसरता मिठाई खातात. पण अनेकांना हे माहीत नसतं की, मिठाईचा एक पीस तुमचं वजन वाढवू शकतं. साखर जी मिटाईतील मुख्य तत्व असते, त्यात कॅलरी भरपूर असते. जर तुम्हाला तुमचं वजन कंट्रोल करायचं असेल तर मिठाई आणि साखर खाणं सोडावं लागेल.
एक चमचा साखर(५ ग्रॅम)मध्ये जवळपास २० कॅलरीज असतात. ऐकायला जरी हे कमी वाटत असलं, तरी तुम्ही दिवसभर चहा, कॉफी, मिठाई आणि इतर फूड्सच्या माध्यमातूनही शुगर मिळवत असता. त्यामुळे कॅलरी वाढून तुमचं वजन वाढतं.
मिठाईच्या एका पीसनं किती वाढतं वजन?
- गुलाब जामून (५० ग्रॅम) - जवळपास १५० ते २०० कॅलरीज.
- रसगुल्ला (५० ग्रॅम) - १२५ ते १५० कॅलरीज.
- बर्फी(४० ग्रॅम) - १५० ते १७० कॅलरीज.
- लाडू (४० ग्रॅम) - १८० ते २०० कॅलरीज.
जर तुम्ही रोज मिठाईचं सेवन करत असाल आणि त्यासोबतच शुगर असलेल्या इतर पदार्थही खात असाल, तर तुमचं वजन वेगानं वाढू शकतं. दर ७, ७०० एक्स्ट्रा कॅलरीजमुळे तुमच्या वजनात १ किलो वाढ होऊ शकते.
साखर आणि मिठाई कमी खाण्यासाठी टिप्स
- मिठाई कमी खा. मिठाई रोज खाण्याऐवजी एखादा इव्हेंट किंवा उत्सव असल्यावरच खा.
- साखरेऐवजी मध, गूळाचा वेगवेगळ्या गोष्टींमध्ये वापर करा. याने कॅलरी वाढणार नाहीत.
- जर तुम्ही मिठाई खाल्ली असेल तर कॅलरी बर्न करण्यासाठी एक्सरसाईज करा.
- आहारात हिरव्या पालेभाज्या, डाळी, ड्राय फ्रूट्स, ताजी फळं यांचा समावेश करा.
साखरेनं आरोग्याला धोका
जास्त साखर खाल्ल्यानं केवळ वजन वाढतं असं नाही तर डायबिटीस, हार्ट डिजीज आणि हाय ब्लड प्रेशरसारख्या समस्यांचा सामना करावा लागतो.