परफेक्ट फिगर हवीये? सेलिब्रिटींसारखं स्लिम फिगर मिळवण्याचा परफेक्ट फंडा....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 11:08 AM2020-01-07T11:08:39+5:302020-01-07T11:15:43+5:30

सध्याच्या काळात परफेक्ट दिसण्यासाठी प्रत्येक महिला प्रयत्न  करत असते.

How To Keep Yourself Maintained for Perfect Figure | परफेक्ट फिगर हवीये? सेलिब्रिटींसारखं स्लिम फिगर मिळवण्याचा परफेक्ट फंडा....

परफेक्ट फिगर हवीये? सेलिब्रिटींसारखं स्लिम फिगर मिळवण्याचा परफेक्ट फंडा....

googlenewsNext

सध्याच्या काळात परफेक्ट दिसण्यासाठी प्रत्येक महिला प्रयत्न  करत असते.  कारण  ऑफिसमध्ये जाताना प्रत्येकालाच स्पेशल दिसायचं असतं.  त्यासाठी परफेक्ट फिगर कशी मिळवता येईल, याचा आपण विचार करत असतो. पण घरच्या आणि ऑफिसच्या कामापासून वेळ मिळत नसल्यामुळे व्यायाम करायला पूरेसा वेळ मिळत नाही. जरी व्यायाम करायचा विचार केला तरी ते नियमित रोज करणं शक्य होत नाही.

अशात बारिक होऊन बॉडी फिटींगचे कपडे घालणं फक्त स्वप्न पाहण्यापूरता मर्यादित राहत असतं प्रत्यक्षात मात्र  आपण जाडचं दिसत असतो. तुम्हीसुद्धा याच  कारणामुळे हैराण झाला असाल तर आज आम्ही  तुम्हाला फिगर मेन्टेंन ठेवण्यासाठी काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्याचा वापर करून  तुम्ही  स्वतःला मेन्टेंन ठेवू शकता. तसंच तुमची शरिरयष्टी सुद्धा यांमुळे सुंदर दिसेल. (हे पण वाचाःवजन वाढण्याची 'ही' कारणं तुम्हाला माहितही नसतील)

महिलांचे खास  करून कंबर, पोट आणि मांड्या या भागांमध्ये   फॅट्स जास्त निर्माण होतं. आणि त्यामुळे शरीराचा आकार बिघडून तुम्ही खराब दिसायला लागता.  मग काहीजरी केलं डाएट असेल, गोड खाणं कमी करणं असेल असे अनेकविध उपाय केले तरी  वजन थोड्या फार फरकाने कमी होतं. पण शरीराचा  आकार आकर्षक आणि चांगला दिसत नाही.

तुम्हाला जर तुमच्या मांड्या  व्यवस्थीत चांगल्या आकारात हव्या असतील तर तुम्ही  स्विमिंग, स्ट्रेचिंग तसंच सायकलिंग  केल्यामुळे तुमच्या मांडीचा मसल( क्वाडरासेप) मजबूत होईल आणि लूज  पडललेली स्कीन पुन्हा टाईट व्हायला लागेल .

तुम्ही आपल्या संपूर्ण शरीराची मालिश आठवड्यातून एकदातरी करून घ्यायला हवी. त्यामुळे तुमची कोरडी  त्वचा दूर होईल. तसंच कंबरेचा भाग निमुळता आणि नाजूक हवा असल्याल स्क्वॅट हा व्यायाम प्रकार जर तुम्ही कराल तर पायांना व्यवस्थित आकार येण्यासाठी फायदेशीर ठरेल. 

पनीर, पीनट बटर, मासं आणि हाय प्रोटीन डायटचा आहारात समावेश करा. जर तुम्हाला असं वाटत असेल की डाएट करण्यासाठी नेहमीपेक्षा वेगळं काही खावं लागेल. किंवा पैसे खर्च करावे लागतील  तर असं अजिबात नाही.

 डाएट करण्यासाठी तुम्ही हलका आहार घ्या जेवणात सॅलेडचा समावेश करा. चपातीऐवजी भाकरी खाण्याची सवय लावा आणि  दोन जेवणांच्या मध्ये भूक लागल्यास चिप्स किंवा चिवडा असे पदार्थ खाणं टाळा.  त्याजागी  सफरचंद किंवा मक्याचे दाणे खा.

तसंच जर वजन कमी करायचं असेल तर तुम्ही  चहा, कॉफी घेणं, पुर्णपणे बंद करा. शक्य नसल्यास सुरूवातीला कमी करा. नंतर संपूर्णपणे  या पदार्थांच सेवन करणं बंद करा. 

तसंच तुम्हाला परफेक्ट  फिगर हवी असेल तर कपडे व्यवस्थित घाला जर  तुम्ही अंतर्वस्त्र फार घट्ट घातल असाल तर तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं . त्यामुळे तुमच्या शरीरातील ब्लडसर्कुलेशवर प्रभाव पडून तुम्हाला समस्येचा सामना करावा लागू शकतो. 

Web Title: How To Keep Yourself Maintained for Perfect Figure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.