एक्सरसाइज करताना घाम येणं गरजेचं असतं की नसतं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 10:08 IST2019-10-03T10:00:31+5:302019-10-03T10:08:51+5:30
एक्सरसाइज करताना घाम गेला पाहिजे असं अनेकदा ऐकायला मिळतं. पण एक्सरसाइज करताना घाम येणं किंवा न येणं अनेकांच्या चिंतेचा विषय असतो.

एक्सरसाइज करताना घाम येणं गरजेचं असतं की नसतं?
(Image Credit : healthline.com)
एक्सरसाइज करताना घाम गेला पाहिजे असं अनेकदा ऐकायला मिळतं. पण एक्सरसाइज करताना घाम येणं किंवा न येणं अनेकांच्या चिंतेचा विषय असतो. जे लोक वजन कमी करण्यासाठी एक्सरसाइज करत असतील तर त्यांच्यासाठी घाम निघण्याचा अर्थ असा होतो की, वजन कमी करण्याचं काम ठीक सुरू आहे. पण खरंच एक्सरसाइज केल्यावर घाम येणं महत्वाचं आहे का? चला जाणून घेऊ एक्सरसाइज दरम्यान घाम येण्याबाबत काही खुलासे करणाऱ्या गोष्टी....
एक्सरसाइज आणि घाम येणे
जेव्हा तुम्ही सामान्य वर्कआउट किंवा व्यायाम करता तेव्हा घाम कमी येतो. तेच जर तुम्ही कार्डिओ एक्सरसाइज किंवा रनिंग करता तेव्हा घाम जास्त येतो. याचं मुख्य कारण हे असतं की, कार्डिओ एक्सरसाइजमध्ये हृदयाचे ठोके जास्त वेगाने होतात, ज्यामुळे घाम येतो. तर दुसरीकडे हेवी एक्सरसाइज करूनही कधी-कधी कुणाला घाम येणार नाही.
तुम्ही पुरेशी एक्सरसाइज करता कसं ओळखाल?
काही लोकांच्या मनात हा भ्रम असतो की, जर एक्सरसाइजनंतर घाम आला नाही, म्हणजे ते आवश्यक ती किंवा योग्य ती एक्सरसाइज करत नाहीयेत. पण फिटनेस एक्सपर्टनुसार, प्रत्येकवेळी घाम येणं गरजेचं नाही. शरीरातून घाम निघण्याच्या तुलनेत आपल्या एक्सरसाइज करण्याचा उद्देश सफल करणं गरजेचं आहे.
वर्कआउट करताना घाम येणं किती गरजेचं?
मुळात काही लोकांना सामान्य एक्सरसाइज केल्यावरही घाम येऊ लागतो. याचं कारण काही लोकांमध्ये आनुवांशिक सुद्धा असतं. काही लोकांमध्ये हेवी एक्सरसाइज करूनही घाम कमी येतो. कार्डिओ एक्सरसाइजमध्ये घाम सामान्य येतो. एक्सरसाइज आणि कार्डिओ एक्सरसाइजमध्ये हृदयाचे ठोके वाढतात, ज्यामुळे घाम येतो.
कधी होतं नुकसान?
काही लोकांमध्ये एक्सरसाइज आणि घाम येण्याबाबत काही गैरसमज असतात. यामुळे अनेकजण एक्सरसाइज जास्त वेळ करतात, कारण त्यांना घाम आला नाही. पण असं करणं नुकसानकारक ठरू शकतं. जर तुम्ही तुमच्या शक्तीनुसार आणि क्षमतेनुसार एक्सरसाइज केली असेल तर घाम यावा म्हणून आणखी एक्सरसाइज करण्याची गरज नाही.
सर्वात महत्त्वाचं
शरीरातून किती घाम निघतो हे वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. जसे की, आनुवांशिक, पाणी पिण्याचं प्रमाण, वातावरण इत्यादी. शरीरातून घाम निघण्याचा नेहमी एक्सरसाइजसोबत संबंध नसतो. जसे की, तुम्ही उन्हात काही वेळ उभे राहिलात तर घाम येऊ लागतो. त्यामुळे पुढीलवेळी एक्सरसाइज कराल तर घामानुसार नाही तर तुमच्या क्षमतेनुसार एक्सरसाइज करा.