शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

पोटाचा आणि कमरेचा आकार वाढलाय? घरच्याघरी योगासनं करून मिळवा परफेक्ट फिगर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 12:49 IST

कामाचा ताण आणि वेळेची कमतरता यांमुळे वजन वाढण्याची समस्या सर्वाधिक जाणवते.

कामाचा ताण आणि वेळेची कमतरता यांमुळे वजन वाढण्याची समस्या सर्वाधिक जाणवते.  अनेक महिला कामात व्यस्त असल्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही. त्यामुळे कंबर आणि पोटावरची चरबी वाढत जाते. यामुळे हवेतसे कपडे घालता येत नाहीत. किंबहूना जे कपडे घालत असतो. त्यात शरीराचा आकार बेढब दिसत असतो. जर तुम्ही सुद्धा वजन वाढण्याच्या समस्येमुळे हैराण झाला असाल किंवा तुम्हाला वजन कमी करण्यासाठी काही करायचं असेल तर जीमला न जाता किंवा कोणतेही जास्त कष्ट न घेता तुम्ही शरीरातील वाढलेली चरबी कमी करू शकता.

त्यासाठी तुम्हाला दिवसातून स्वतःसाठी फक्त १५ ते २० मिनिटं द्यावी लागणार आहेत. घरच्या घरी काही योगासनं करून तुम्ही आपली फिगर मेटेंन करू शकता. चला तर मग जाणून घेऊया ही योगासनं केल्याने कशाप्रकारे तुमचं वजन कमी होऊ शकतं. ( हे पण वाचा-व्यायाम आणि डाएटिंग करून सुद्धा वजन कमी होत नाही? तर हे असू शकतं कारण, वेळीच व्हा सावध!)

चक्रासन

चक्रासन करत असताना तुम्हाला संपूर्ण शरीर हे गोलाकार फिरवावं लागतं. पण कॅलरीज बर्न करण्यासाठी फायदेशीर ठरत असतं. हे आसन करण्यासाठी आधी पाठीवर झोपा. त्यानंतर  कंबरेला गोल आकारात हळू हळू   जमीनीच्या दिशेने वाकवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर हातांना मागच्या बाजूला फिरवत जमिनीपर्यंत आणा. पाय तसेच ठेवा. ( हे पण वाचा-जगाची चिंता वाढवणाऱ्या Corona Virus चं मूळ सापडलं, 'या' प्राण्यापासून मनुष्यांना झाली लागण!)

चक्रासन हे योगासनातील कठीण आसन असले तरी, नियमित सरावात सहज करता येते. याचे फायदेही आयुष्यभर होतात. चक्रासनाद्वारे लवचिकता येते. डोळ्यांचे आजार होत नाही. कंबरेचा त्रास होत नाही. स्नायू बळकट होतात. पोटाची चरबी कमी होते, उंची वाढते, शारीरिक-मानसीक आणि बौद्धिक विकासात भर पडते.  

चतुरंग

वजन कमी करण्यासाठी आणि शरीरात जमा झालेली अतिरीक्त  चरबी कमी करण्यासाठी  चतुरंग आसन फायदेशीर ठरतं असतं. हे आसन करण्यासाठी पुशअप्सच्या पोजिशनमध्ये यावं लागेल. यामुळे तुमच्या शरीराचे मसल्स मजबूत होतील.  दररोज हे आसन ५ ते १० मिनिट करा. त्यामुळे कॅलरिज बर्न होण्यास मदत होईल. त्यामुळे तुमच्या पायांची स्ट्रेन्थ वाढत असते.  ज्या लोकांना हातांवरची अतिरीक्त चरबी कमी करायची असते त्याच्यासाठी हे आसन फायदेशीर ठरेल.

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स