वातावरणातील बदलांचा परिणाम त्वचेवर तसेच केसांवर देखील होत असतो. त्वचेची काळजी घेणे तुलनेने सोपे असते, आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात केसांवर महागडया ब्यु़टी ट्रिटमेंट घेणे प्रत्येक वेळी शक्य नसते. यासाठी टेन्शन घेण्याची काही आवश्यकता नाही. घरगुती उपायांचा वापर करून देखील आकर्षक आणि लांबसडक मिळवता येऊ शकतात.घरात सहज उपलब्ध होईल अशा पदार्थांचा वापर करून केसांचे आरोग्य जपण्यासाठी या टिप्सचा अवलंब करा.

१) कांदा­

तुम्हाला केस गळण्याच्या समस्येचा सामना करावा लागत असेल तर  कांदा हा महत्त्वाचा पर्याय आहे. कांद्याचा  रस केसांच्या मुळांना लावा.आणि अर्धा तास झाल्यानंतर केस स्वच्छ पाण्याने धवा. त्यामुळे केस गळणे कमी होईल. आणि केस चमकदार दिसतील.

२) लिंबू

जर तुमच्या केसात कोंडा झाला असेल ,आणि  बरेच उपाय केल्यानंतरही त्याचा परीणाम दिसून येत नसेल, तर घरी लिंंबाचा रस करुन हलक्या हाताने केसांना मसाज करा. त्यामुळे केसातील कोंडा दूर होण्यास आणि केस वाढण्यास मदत होईल.

) ऑलिव्ह ऑईल


केसांना वेगवेगळ्या समस्यांपासून वाचवण्यासाठी आणि मुलायम ठेवण्यासाठी ऑलिव्ह ऑईल फायदेशीर ठरते.

) ग्रीन टी


केसांना सुंदर बनविण्यासाठी ग्रीन टी महत्त्वाचा घटक मानला जाते. ग्रीन टी चा पॅक तयार करून केसांना लावल्यास केस घनदाट आणि मऊ होतात. महिन्यातून दोनदा हा प्रयोग केल्यास फरक दिसून येईल.

५) दही

दही  हे केसांसाठी गुणकारी आहे. त्यामुळे केसांची वाढ होण्यास मदत होते. केस मऊ आणि मुलायम होतात.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: How to get long hair using home remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.