वाढलेल्या पोटामुळे आवडत्या कपड्यांना मुकताय? करा 'हे' उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2018 18:04 IST2018-07-04T18:04:16+5:302018-07-04T18:04:23+5:30
लठ्ठपणा ही लहानग्यांपासून अगदी थोरामोठांपर्यंत भेडसावणारी गंभीर समस्या आहे. अतिलठ्ठपणामुळे मधुमेह, कॅन्सर आणि ह्रदयाशी संबंधित आजार होण्याची अधिक शक्यता असते.

वाढलेल्या पोटामुळे आवडत्या कपड्यांना मुकताय? करा 'हे' उपाय!
लठ्ठपणा ही लहानग्यांपासून अगदी थोरामोठांपर्यंत भेडसावणारी गंभीर समस्या आहे. अतिलठ्ठपणामुळे मधुमेह, कॅन्सर आणि ह्रदयाशी संबंधित आजार होण्याची अधिक शक्यता असते. जर तुम्ही जिममध्ये जाऊन आणि डाएट फॉलो करून कंटाळला असाल, तर आम्ही तुम्हाला वजन कमी करण्याचा सर्वात सोपा उपाय सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला भरपूर व्यायाम करण्याची तसेच खुप परिश्रम करण्याचीही गरज नाही.
बऱ्याचदा वजन वाढल्यामुळे आपले आवडते कपडे घालणेही शक्य होत नाही. अनेकदा वाढलेल्या पोटाच्या घेरामुळे तुम्ही तुमची आवडती जिन्सही घालू शकत नाही. आम्ही तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्ही अवघ्या दहा मिनिटांमध्ये तुमच्या पोटाची चरबी कमी करू शकता.
जर तुम्ही वाढलेल्या पोटाच्या घेरामुळे वैतागलेले असाल, तर त्यासाठी तुम्हाला स्क्वाट व्यायाम करण्याची गरज आहे. या व्यायामुळे तुम्हाला लगेचच सकारात्म प्रभाव जाणवेल.
खाली दिल्यानुसार तुम्ही स्क्वाट प्रकारचा व्यायाम करू शकता.
- सर्वात आधी सरळ उभे रहा आणि खांदेही सरळ ठेवा.
- तुमचे हात पुढच्या दिशेला ठेवत जेवढे शक्य होतील तेवढे बसण्याचा प्रयत्न करा.
- यादरम्यान तुमच्या पाठीला सरळ ठेवा आणि समोर बघा.
- त्यानंतर तुम्हाला 20 सिट-अप्स करायचे आहेत.
- त्यानंतर तुम्हाला तुमच्या पोटाचा घेर कमी झाल्याचे दिसून येईल.
टिप - हा उपाय तात्पुरता असून घट्ट झालेले कपडे सहज परिधान करता येण्यासाठीच हा उपाय आहे. पुर्णपणे वजन कमी करण्यासाठी तुम्हाला योग्य ते इतर उपाय करावे लागतील.