खरंच वजन कमी करण्यासाठी सकाळी पाणी पिणं गरजेचं आहे का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 10:18 IST2019-11-11T10:14:18+5:302019-11-11T10:18:42+5:30
आरोग्य चांगलं राहण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिणं फार गरजेचं आहे, हे तुम्हाला माहीत आहेच.

खरंच वजन कमी करण्यासाठी सकाळी पाणी पिणं गरजेचं आहे का?
(Image Credit : allure.com)
आरोग्य चांगलं राहण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिणं फार गरजेचं आहे, हे तुम्हाला माहीत आहेच. खासकरून तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर भरपूर पाणी पिणं गरजेचं आहे. सकाळी उठून सर्वातआधी पाणी पिण्याच्या फायद्यांबाबत तुम्ही ऐकले असेलच. वजन कमी करण्यासाठी सकाळी कोमट पाणी प्यावे असे सांगितले जाते. पण सकाळी पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यास नक्की फायदा होतो का? आणि कसा होतो? हे जाणून घेऊ...
कॅलरी बर्न होतात
असे सांगितले जाते की, पाणी प्यायल्याने कॅलरी इनटेक कमी होतं. कारण याने तुमचं पोट भरलेलं राहतं. पण हे पूर्णपणे सत्य नाहीये. तरूणांसाठी हे फारसं फायदेशीर नाही. पाणी पिऊन शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत मिळते.
टॉक्सिक
आपल्या शरीरातून नुकसानकारक तत्व दूर करण्याचं काम किडनीचं असतं. पाण्याने किडनीला चांगलं काम करण्यास मदत नक्कीच होते. पण याचा पाणी पिण्याच्या वेळेसोबत काहीही संबंध नाही.
रिहायड्रेट
सकाळी लघवीचा रंग डार्क पिवळा झाल्याने लोकांना वाटतं की, त्यांचं शरीर डिहायड्रेट झालं आणि सकाळी पिणं गरजेचं आहे. पण हे लक्षात घ्यायला पाहिजे की, लघवीचा रंग हा हायड्रेशनचं निश्चिक मापक नाही. जास्त कॉनसन्ट्रेटेड झाल्याने सकाळी लघवीचा रंग डार्क होतो.
हेही महत्वाचं
हे स्पष्ट नाही की, सकाळी उठल्यावर पाणी प्यायल्याने वजन कमी करण्यास मिळते किंवा नाही. पण जर तुम्हाला सकाळी पाणी पिण्याचा सवय असेल तर त्यात काही वाईट नाही. पण दिवसभर शरीर हायड्रेट ठेवण्याची तुम्हाला गरज असते. त्यामुळे दिवसभरात जास्तीत जास्त पाणी सेवन करणं गरजेचं आहे.