कोरोना व्हायरसचे संक्रमण थांबवण्यासाठी कर्फ्यु  रविवारी  कर्फ्यु लावण्यात आला होता. आता लोकांना बाहेर पडण्यासाठी सुद्धा बंदी घालण्यात आली आहे.  आधीच अनियमीत जीवनशैलीमुळे अनेकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागतो.  त्यातल्या त्यात आता घरी बसायचं म्हणल्यानंतर ही समस्या वाढतचं जाणार. म्हणजेच वजन वाढण्याची समस्या  अनेकांना उद्भवणार.

आज आम्ही तुम्हाला वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी काही टिप्स सांगणार आहोत या टिप्सचा वापर करून तुम्ही आपलं वजन वाढण्यापासून रोखू शकता. आहार घेत असताना काही पदार्थांचे सेवन टाळलं किंवा काही पदार्थांचा समावेश आहारात केला तर तुम्ही स्वतःचं आरोग्य चांगलं ठेवू शकता. 


बदाम

बादाम खाणं हे आरोग्यासाठी  तसंच  स्मरणशक्ती व्यवस्थित राहण्यासाठी फायद्याचं असतं. वजन कमी करण्यासाठी सुद्धा बदामाचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे. बदामात  प्रोटीन्स आणि शरिराला आवश्यक असणारे अनेक घटक असतात. त्यासाठी रोज रात्री बदाम भिजवत ठेवून  सकाळी बदामाचं सेवन करा. 

आळशीच्या बीया

Image result for flaxseed

फ्लेक्ससीड्स म्हणजेच आळशीच्या बीया प्रोटीन्सचं प्रमुख स्त्रोत आहेत. यात ओमेगा३ फॅटी एसिड्स आणि फायबरर्स मोठ्या प्रमाणावर असतात.  म्हणून आळशीच्या बीयांचा आहारात समावेश करून आरोग्य चांगलं ठेवा.

जास्त मीठ खाऊ नका

मीठाच्या सेवनाने हृद्यासंबंधित आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे हृद्याचे आरोग्य चांगले राखण्यासाठी योग्य प्रमाणात मीठाचे सेवन करणं गरजेचं आहे. तुम्हाला डिहायड्रेशनची समस्या जाणवत असेल तर तुम्ही मीठाचे अधिक सेवन करता. जेवणात अधिक मीठाचा वापर केल्यास डिहायड्रेशनची समस्या उद्भवते. तसंच लठ्ठपणाची समस्या सुद्धा जाणवत असते. 

गरम पाणी

गरम पाणी प्यायल्याने शरिरातील अतिरिक्त चरबी निघून जाते. त्यामुळे शरिरातील सर्व भाग सुरळीत काम करतात. सकाळी उढून एक ग्लास गरम पाणी प्यायल्याने त्वचा चांगली होते आणि शरीर सुदृढ बनतं.   म्हणून घरी असताना जास्तीत जास्त गरम पाणी प्या. (  हे पण वाचा-कोरोनापेक्षाही जास्त त्रासदायक असतं फुप्फुसाचं फंगल इन्फेक्शन, जाणून घ्या बचावाचे उपाय)

Web Title: How to do weight loss in vacation by using this tips myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.