वाढत्या वजनामुळे अनेकजण हैराण आहेत आणि वजन कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपायांचा वापर करत आहेत. एक्सरसाइज करणे आणि लाइफस्टाइलमधून चुकीच्या सवयी दूर करून तुम्ही वजन कमी करू शकता. तसं वजन कमी करणं काही सोपं काम नाही. त्यासाठी तुम्हाला बरीच मेहनत घ्यावी लागते. अनेकजण वजन कमी करण्यासाठी गरम लिंबू पाण्याचं सेवन करतात, तसाच थंड लिंबू पाण्याचाही फायदा वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी होऊ शकतो. पण केवळ लिंबू पाणी सेवन करून वजन कमी होईल असा विचार करत असाल तर तुम्ही चुकताय.
थंड लिंबू पाण्याचे फायदे
१) कॅलरी कमी होतात
२) मेटाबॉलिज्म बूस्ट होतं
३) पोट जास्त वेळ भरलेलं राहतं
४) शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघतात
कॅलरी कमी होतात
थंड लिंबू पाण्यात कॅलरी फार कमी प्रमाणात असतात. पाण्यात झीरो कॅलरी असतात आणि एका लिंबूमध्ये केवळ १७ कॅलरी असतात. त्यामुळे वजन कमी करण्याच्या प्रक्रियेदरम्यान थंड लिंबू पाण्याचं सेवन करणं एक चांगला पर्याय मानला जातो.
मेटाबॉलिज्म मजबूत होतं
लिंबू पाण्यामुळे मेटाबॉलिज्म मजबूत होतं, जे वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. जर शरीर हायड्रेट राहिलं तर याने तुमच्या मायटोकॉन्ड्रियाला योग्यप्रकारे काम करण्यास मदत मिळते.
पोट जास्त वेळ भरलेलं राहतं
लिंबू पाण्याचं सेवन केल्याने तुमची चुकीचे पदार्थ खाण्याची सवय कमी होते. वजन कमी करण्यासाठी जेवणादरम्यान लिंबू पाण्याचं सेवन करा, जेणेकरून भूक नियंत्रित केली जावी. याचं कारण म्हणजे लिंबू पाण्यात कॅलरीचं प्रमाण कमी असतं.
शरीरातील टॉक्सिन्स नष्ट होतात
थंड लिंबू पाण्याचं सेवन केल्याने शरीरातील टॉक्सिन्स म्हणजेच विषारी पदार्थ बाहेर निघतात आणि याने शरीर क्लिंज होतं. ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत मिळते.
वजन कमी करण्यासाठी किती लिंबू पाण्याचं सेवन करावं?
ज्या लोकांचं वजन ६८ किलो आहे, त्यांनी ८ ते १२ मिली थंड लिंबू पाण्याचं सेवन करावं आणि ज्या लोकांचं वजन ६८ किलोपेक्षा अधिक आहे. त्यांनी रोज २ वेळा लिंबू पाण्याचं सेवन करावं.
(टिप : वरील सल्ले किंवा उपाय हे केवळ माहिती म्हणून देण्यात आले आहेत. हे उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा. कारण हे उपाय सगळ्यांनाच फायदेशीर ठरतील असं नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरेल.)