वजन कमी करण्यासाठी फॉलो करा कॉफी डाएट, कशी ते जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 10:54 IST2019-07-15T10:50:13+5:302019-07-15T10:54:44+5:30
वजन कमी करण्यासाठी कॉफी मदत करते. वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये कॉफीचा समावेश करण्याला कॉफी डाएट असं म्हणतात.

वजन कमी करण्यासाठी फॉलो करा कॉफी डाएट, कशी ते जाणून घ्या
(Image Credit : nypost.com)
तुम्ही वजन कमी करण्यासाठी तुमच्या डाएटमध्ये अशा पदार्थांचा नक्कीच समावेश असेल, ज्यांनी तुम्हीला वजन कमी करण्यास मदत मिळते. पण तुम्ही कधी कॉफीचा डाएटमध्ये समावेश केलाय? नसेल केला तर करावा असा सल्ला काही रिसर्चमधून देण्यात आला आहे. कारण वजन कमी करण्यासाठी कॉफी मदत करते. वजन कमी करण्यासाठी डाएटमध्ये कॉफीचा समावेश करण्याला कॉफी डाएट असं म्हणतात.
काय आहे कॉफी डाएट?
शरीरातून अतिरिक्त कॅलरी, चरबी आणि वजन कमी करण्यासाठी तुम्हाला दर दिवशी एक ते तीन कप कॉफीचा डाएटमध्ये समावेश करावा लागेल. यालाच कॉफी डाएट असं नाव देण्यात आलं आहे. या कॉफी सेवनावर अधिक जोर दिला जातो. कारण याने वजन कमी करण्यास मदत मिळते. पण याचं सेवन फार जास्तही करू नये, कारण यातील कॅफीनमुळे आरोग्याला धोकाही होऊ शकतो.
(Image Credit : LinkedIn)
एका रिसर्चमध्ये दावा करण्यात आला आहे की, दररोज एक कप कॉफी प्यायल्याने मेटाबॉलिज्म वाढण्यास मदत मिळते. याने चरबी कमी होण्यासोबतच कॅलरी सुद्धा बर्न होतात. तसेच कॉफीमध्ये भूक कमी करण्याची क्षमताही असते.
वजन कसं होतं कमी?
- या डाएट प्लॅनमध्ये तुम्हाला प्रत्येक दिवशी जवळपास ३ कप हलक्या रोस्ट कॉफीचं सेवन करावं लागेल. हलकी रोस्ट कॉफीमध्ये डार्क रोस्ट कॉफीच्या तुलनेत अधिक पॉलीफेनोल अॅंटी-ऑक्सिडेंट असतात. त्यामुळे कॉफी डाएटमध्ये तुम्हाला हलक्या भाजलेल्या बियांची कॉफी प्यावी लागते. ही तुम्ही घरीच बारीक करून किंवा फिल्टर्ड पाण्याचा वापर करून तयार करू शकता. तीन कप कॉफीचं सेवन एका दिवसात करावं, पण त्यात साखर आणि क्रीमचा वापर करू नये.
(Image Credit : Dr. Weil)
- सोबतच आहारही हेल्दी घ्यावा. यात हाय फायबरयुक्त पदार्थ, फळं आणि भाज्यांचा समावेश करा. लो कॅलरी किंवा चरबी असलेले हेल्दी स्नॅक्स, कडधान्य, फायबर असलेली फळं आणि भाज्या भरपूर प्रमाणात खाव्यात. प्रोसेस्ड फूड्स आणि फ्रोजन फूड्सचं सेवन बंद करा. टोफू, ब्राउन राइस, ग्रिल्ड चिकन, सलाद इत्यादींचाही समावेश करा.
भूक होईल कमी
कॉफी डाएटमुळे तुमची भूक कमी होण्यासोबतच कॅलरीचं प्रमाण देखील कमी होण्यास मदत मिळते. तुम्हाला लवकर वजन कमी करायचं असेल तर जेवण करण्यापूर्वी एक कप कॉफी घेऊ शकतो. याने तुमची भूक कमी होईल आणि जास्त खाणार नाही.
(टिप : वरील लेखातील सल्ले हे केवळ माहिती म्हणून देण्यात आले आहेत. तुमच्या डाएटमध्ये कोणताही बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या)