स्ट्रेसची आणखी काही विचित्र कारणे आली समोर, तुम्हालाही असं होतं का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 10:35 AM2019-11-11T10:35:27+5:302019-11-11T10:41:09+5:30

स्ट्रेस आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग झाला आहे. खासकरून वर्कलाइफमध्ये स्ट्रेस फारच सामान्य बाब झाली आहे.

How can you manage your Worklife stress | स्ट्रेसची आणखी काही विचित्र कारणे आली समोर, तुम्हालाही असं होतं का?

स्ट्रेसची आणखी काही विचित्र कारणे आली समोर, तुम्हालाही असं होतं का?

Next

(Image Credit : euroimmunblog.com)

स्ट्रेस आपल्या जीवनाचा एक महत्वाचा भाग झाला आहे. खासकरून वर्कलाइफमध्ये स्ट्रेस फारच सामान्य बाब झाली आहे. याच स्ट्रेसमुळे लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होत आहे. तणावामुळे म्हणजेच स्ट्रेसमुळे हृदयरोग, डायबिटीस, लठ्ठपणा, अस्थमा आणि पोटासंबंधी समस्या होऊ शकतात. अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, भारतात वर्कप्लेस स्ट्रेसचं प्रमाण खूप जास्त आहे.

(Image Credit : neurowellnessspa.com)

नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार, इतर विकसनशील देशांच्या तुलनेत ८२ टक्के भारतीय कोणत्या ना कोणत्या कारणाने तणावात राहतात. या कारणांमध्ये आरोग्य, आर्थिक स्थिती आणि काम यासोबतच आणखीही काही गोष्टींचा समावेश आहे.

हे आहे कारण

(Image Credit : thehealthy.com)

एका प्रायव्हेट फर्मकडून करण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये मेट्रो शहरातील ५६ टक्के लोकांचं मत होतं की, ते कामावर जात असताना रोड रेजचे शिकार होऊ मरू शकतात. १६ टक्के लोक म्हणाले की, त्यांना सर्व्हिस प्रोव्हायडर्स जसे की, ड्रायव्हर किंवा ट्रॅफिक पोलिसांवर लवकर राग येतो.

(Image Credit : brunet.ca)

त्यासोबतच तणावाच्या कारणांमध्ये सोशल मीडिया, वर्क-लाइफ बॅलन्स आणि शेजाऱ्यांशी वाद यांचाही समावेश आहे. ६८ टक्के लोकांनी हे मान्य केलं की, जर वाय-फाय कनेक्शन अचानक गेलं तर त्यांना फार राग येतो. ६३ टक्के म्हणाले की, जर कुणी न विचारता त्यांचा चार्जिंगला लावलेला फोन काढला तर ते संतापतात.

स्ट्रेस कसा कराल दूर

(Image Credit : womenshealth.gov)

एक्सपर्ट्स सांगतात की, वेगवेगळ्या लोकांमध्ये स्ट्रेसचं प्रमाण वेगवेगळं असतं. त्यांच्या शरीरावर याचा वेगळा प्रभाव पडतो. स्ट्रेसमुळे कुणाची पचनक्रिया कमजोर होते तर एखाद्याची झोप उडते, काहींचं डोकं दुखतंतर काहींना मूड स्विंग होतात. या सगळ्यांनी ते स्ट्रेसमध्ये का आहेत याचा शोध घेतला पाहिजे. आणि यातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यासाठी मॉर्निंग वॉक, एक्सरसाइज, मेडिटेशन आणि ट्रॅव्हलिंगसारख्या अ‍ॅक्टिविटी लोकांनी कराव्या.


Web Title: How can you manage your Worklife stress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.