अनेक दिवसांपासून Acidity ने वैतागलात? 'या' आयुर्वेदिक उपायाने लगेच मिळेल आराम!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 14:48 IST2024-12-23T14:47:33+5:302024-12-23T14:48:14+5:30
थोडं काही खाल्लं की, आंबट ढेकर, छातीत जळजळ, पोटात जळजळ होऊ लागते. ही समस्या दूर करण्यासाठी डॉक्टरांनी एक सोपा उपाय सांगितला आहे.

अनेक दिवसांपासून Acidity ने वैतागलात? 'या' आयुर्वेदिक उपायाने लगेच मिळेल आराम!
अॅसिडिटीची समस्या फारच कॉमन आहे. बऱ्याच लोकांना काही उलटसुलट खाल्ल्यावर अॅसिडिटीची समस्या होते. औषध घेतल्यावरही आराम मिळत नाही. थोडं काही खाल्लं की, आंबट ढेकर, छातीत जळजळ, पोटात जळजळ होऊ लागते. ही समस्या दूर करण्यासाठी डॉक्टरांनी एक सोपा उपाय सांगितला आहे.
अॅसिडिटीची समस्या दूर करण्याचा उपाय डॉक्टर निशांत गुप्ता यांनी सांगितला आहे. डॉक्टरांनी सांगितलं की, हा उपाय केल्यावर अॅसिडिटीची जुनी समस्या ५ ते १० दिवसात गायब होईल. या उपायाने क्रॉनिक डिजीजही बरा केला जाऊ शकतो.
काय लागेल साहित्य?
जवाचा दलिया
अडुळशाची पाने
वाळलेला आवळा किंवा आवळ्याचं पावडर
कसं बनवाल औषध?
वरील सगळ्या गोष्टी धुवून चांगल्या सुकवा. तिन्ही समान प्रमाणात मिक्स करून बारीक करा. याचं एक-एक ग्रॅम पावडर सकाळी आणि सायंकाळी पाण्यात टाकून प्या.
दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात
जर अॅसिडिटीची समस्या तुम्हाला खूप दिवसांपासून असेल तर याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. यामुळे आरोग्यासंबंधी इतरही अनेक समस्या होऊ शकतात. ज्यात इसोफेगिटिस, बॅरेट इसोफेगस, इसोफेगियल स्ट्रिक्चर, अस्थमा इत्यादींचा समावेश आहे.