रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यात टाकून प्या 'ही' एक गोष्ट, सकाळी काही मिनिटात साफ होईल पोट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 12:45 IST2025-01-30T12:44:51+5:302025-01-30T12:45:20+5:30
How To Get Rid Of Constipation: आयुर्वेदिक उपचारांमध्ये काही असे उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यांद्वारे पचन तंत्र तर मजबूत होतंच, सोबतच शरीरही डिटॉक्स होतं.

रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यात टाकून प्या 'ही' एक गोष्ट, सकाळी काही मिनिटात साफ होईल पोट!
How To Get Rid Of Constipation : आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी पचन तंत्र चांगलं राहणं खूप महत्वाचं असतं. जर पचन तंत्रात काही गडबड असेल तर आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. खाण्या-पिण्याच्या How To Get Rid Of Constipation: चुकीच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे पचन तंत्र बिघडतं. त्यानंतर पोट साफ न होण्याची समस्या होते. पोट साफ न होणे म्हणजेच बद्धकोष्ठता आज एक मोठी समस्या बनली आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना ही समस्या असते. पोट जर साफ झालं नाही तर पोटात दुखणं, पोट फुगणं, अॅसिडिटी अशा समस्या होतात. अशात पोट साफ होण्यासाठी काही उपाय सांगत आहोत.
आयुर्वेदिक उपचारांमध्ये काही असे उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यांद्वारे पचन तंत्र तर मजबूत होतंच, सोबतच शरीरही डिटॉक्स होतं. जर तुम्हालाही पोट साफ न होण्याची समस्या असेल तर रात्री झोपण्याआधी कोमट पाण्यात काही गोष्टी टाकून प्यायल्यास मदत मिळू शकते.
१) लिंबू आणि मध
लिंबामधील व्हिटॅमिन सी आणि अॅंटी-ऑक्सिडेंट्स शरीरातून विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतात. तेच मध बद्धकोष्ठता दूर करतं आणि पोटाला आराम देतं. एक ग्लास पाण्यात अर्ध्या लिंबाचा रस आणि एक चमचा मध टाका. हे पाणी रात्री झोपण्याआधी प्या. यानं पचन तंत्र अॅक्टिव राहतं.
२) जिरे पावडर
जिऱ्याचा वापर वेगवेगळ्या उपचारांमध्ये केला जातो. जिऱ्यानं पोटातील सूज आणि गॅस कमी करण्यास मदत मिळते. तसेच जिऱ्यानं पचनक्रिया सुधारते. अर्धा चमचा जिरे पावडर एक ग्लास कोमट पाण्यात रात्री झोपण्याआधी प्या. सकाळी पोट लगेच साफ होईल.
३) त्रिफळा चूर्ण
आयुर्वेदात त्रिफळा चुर्णाला पोट साफ करण्यासाठी आणि बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी सगळ्यात बेस्ट उपाय मानलं आहे. या चुर्णानं आतड्या हेल्दी राहतात. एक चमचा चूर्ण एक ग्लास कोमट पाण्यात टाकून प्यायल्यास सकाळी पोट सहज साफ होईल.
४) अॅपल व्हिनेगर
अॅपल सायडर व्हिनेगरनं आतड्यांची सफाई होते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत मिळते. एक चमचा अॅपल सायडर व्हिनेगर पाण्यात टाकून प्या.