घरातील एकाही कोपऱ्यात दिसणार नाहीत झुरळ, लगेच सुरू करा हे सोपे घरगुती उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 14:45 IST2024-04-26T14:45:05+5:302024-04-26T14:45:42+5:30
लोक झुरळ घरातून पळवून लावण्यासाठी वेगवेगळे उपायही करतात. पण सगळ्यांनाच यश मिळत असं नाही.

घरातील एकाही कोपऱ्यात दिसणार नाहीत झुरळ, लगेच सुरू करा हे सोपे घरगुती उपाय!
लोक डासांसोबतच घरात वाढलेल्या झुरळांमुळे हैराण झालेले असतात. घरातील कोपऱ्या कोपऱ्यात झुरळांचं साम्राज्य असतं. किचन असो वा बेडरूम सगळीचे लहान मोठे झुरळ फिरत असतात. ज्यामुळे आरोग्यही धोक्यात येतं. लोक झुरळ घरातून पळवून लावण्यासाठी वेगवेगळे उपायही करतात. पण सगळ्यांनाच यश मिळत असं नाही. अशात आज आम्ही तुमच्यासाठी काही खास घरगुती उपाय घेऊन आलो आहोत.
1) तेजपत्ते
तेजपत्ताच्या सुगंधाने झुरळं बाहेर पळतात. घरातील ज्या कोपऱ्यात झुरळ अधिक प्रमाणात असतात त्याठिकाणी तेजपत्त्याची काही पाने बारीक करुन ठेवा. तेजपत्ते बारीक केल्यावर तुमच्या हाताला तेल लागल्याचे दिसेल. याच तेलाचा सुगंध झुरळांना पळवून लावतो. ही पाने काही दिवसांनी बदलत रहावी.
2) बेकिंग पावडर आणि साखर
एका वाटिमध्ये समान प्रमाणात बेकिंग पावडर आणि साखर मिश्रित करा. साखरेचा गोडव्याकडे झुरळं आकर्षित होतात. आणि बेकिंग सोड्यामुळे ते मारले जातात.
3) लवंग
झूरळाला घरातून पळवून लावण्यासाठी लवंगचा फार फायदा होतो. ज्या ज्या जागांवर झुरळं येतात त्या ठिकाणी काही लवंग ठेवाव्यात. लवंगेच्या उग्र दर्पामुळे झुरळं घरातून पळतात.
4) बोरिक पावडर
बोरिक पावडर घरातील काही जागांवर टाकल्यास झुरळं घरातून पळ काढतात. पण हे पावडर टाकताना काळजी घेणे गरजेचे आहे. घरातील लहान मुलांना या पावडरपासून दूर ठेवा.
5) केरोसिनचा वापर
केरोसिनचा वापर करुनही घरातील झुरळं पळवून लावता येतात. पण याच्या वासाने तुम्हालाही त्रास होऊ शकतो.