कोरोनाला दूर ठेवण्याासह फुफ्फुसांच्या इन्फेक्शनपासून लांब राहण्यासाठी करा 'हे' उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 06:50 PM2020-05-20T18:50:40+5:302020-05-20T18:54:40+5:30

फुफ्फुसांचं इन्फेक्शन आणि कोरोनाचा व्हायरसपासून लांब राहण्यासाठी आज आम्ही काही उपाय सांगणार आहोत.

Home remedies include herbs and food in your diet to strong your lungs myb | कोरोनाला दूर ठेवण्याासह फुफ्फुसांच्या इन्फेक्शनपासून लांब राहण्यासाठी करा 'हे' उपाय

कोरोनाला दूर ठेवण्याासह फुफ्फुसांच्या इन्फेक्शनपासून लांब राहण्यासाठी करा 'हे' उपाय

Next

 कोरोना व्हायरसची लागण  होत असलेल्या रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. तर मृत्यू होत असलेल्या लोकांची संख्या सुद्धा वाढत आहे. वयस्कर लोकांना आणि आधीपासूनच आजारी असलेल्या लोकांना कोरोना व्हायरसचं संक्रमण होण्याचा धोका जास्त असतो. त्यासाठी जीवनशैली चांगली ठेवण्यासोबतच चांगला आहार घेणं गरजेचं आहे.

फुफ्फुसांचं इन्फेक्शन आणि कोरोनाचा व्हायरसपासून लांब राहण्यासाठी आज आम्ही काही उपाय सांगणार आहोत. या उपायांचा वापर करून तुम्ही निरोगी राहू शकता. तुम्हाला जर आजारांपासून लांब राहायंच असेल तर संतुलित आहाराचे सेवन करा. कारण फॅट्सयुक्त आहार, मादक पदार्थाचे सेवन यामुळे फुफ्फुसांना इजा पोहोचते.  

मध  

मधाचे सेवन करणं आरोग्याच्या दृष्टीने फायदेशीर ठरतं. मधामध्ये अँटीऑक्सीडेंट्स, अँटीमाइक्रोबियल, अँटी-इंफ्लामेटरी गुण असतात. यामुळे फुफ्फुसं स्वच्छ होण्यास मदत होते. एक चमचा मध फुफ्फुसांसाठी लाभदायक ठरू शकते.

पाणी

शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्या. गरम पाण्याची वाफ घ्याय, खोकला जास्त आल्यामुळे घसा खवखवतं असेल तर पाण्यात मध आणि लिंबू घालून प्या. धुम्रपान आणि मद्यपानापासून लांब राहा.

ग्रीन-टी

ग्रीन-टी फुफ्फुसांच्या स्वच्छतेसाठी खुप  लाभदायक आहे. ग्रीन-टीमध्ये भरपूर अँटीऑक्सीडेंट्स असतात. तसेच फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन कमी करण्याचे कामही ग्रीन टी करते. ग्रीन-टीमधील इतर घटक धुरामुळे फुफ्फुसाचे होणारे नुकसान टाळण्यास मदत करतात.

तुळशीची पानं

एका भांड्यात एक ग्लास गरम पाणी टाकून कमी आसेवर गॅसवर ठेवा. यात तुळशीची पाने, आल्याची पेस्ट गूळ टाकून ५ मिनिटे उकळू द्या. जेव्हा या मिश्रणाला चांगली उकळी येईल तेव्हा हे मिश्रण ग्लासमध्ये टाका. हे तुम्ही दररोज थोडं थोडं सेवन करु शकता. या सिरपमुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होईल आणि शरीराचा वायू प्रदुषणाच्या प्रभावांपासून बचावही करेल.   

आयुर्वेदिक चहा

 भांड्यात दूध टाकून ते कमी आसेवर गॅसवर ठेवा. नंतर त्यात हळद, तूप, आलं, काळे मिरे, लवंग आणि तुळशीची पाने टाका. ५ मिनिटे हे मिश्रण चांगलं उकळू द्या. नंतर यात मध टाका. हे दूध लहान मुलांसोबतच मोठ्यांसाठीही फायदेशीर आहे. त्यामुळे श्वासासंबंधी आजार बरे होण्यास मदत होईल.

कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी तयार केली अनोखी मशिन, संसर्ग टाळणं होईल सोपं

CoronaVirus: धक्कादायक! जास्तवेळ मास्कचा वापर करणं ठरू शकतं जीवघेणं? जाणून घ्या सत्य

Web Title: Home remedies include herbs and food in your diet to strong your lungs myb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.