CoronaVirus: धक्कादायक! जास्तवेळ मास्कचा वापर करणं ठरू शकतं जीवघेणं? जाणून घ्या सत्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 12:01 PM2020-05-20T12:01:24+5:302020-05-20T12:19:30+5:30

सध्या कोरोना व्हायरसमुळे जगभरात दहशतीचं वातावरण पसरलं आहे. साधा ताप, खोकला झाला तरी लोक घाबरत आहेत. घरात किंवा बाहेर जास्त खबरदारी घेताना दिसून येत आहेत. नेहमी मास्क आणि ग्लोव्हजचा वापर करणं लोकांच्या जीवनशैलीचा भाग ठरला आहे. कोरोनाविरुद्धच्या लढाईत मास्कचा वापर हत्याराप्रमाणे केला जात आहे.

म्हणून मास्कचा वापर सगळ्याच ठिकाणी अनिवार्य करण्यात आला आहे. जर तुम्ही घरातून बाहेर निघत असाल तर फेस मास्क लावून मगच निघायला हवं. पण सध्या मास्कबाबत सोशल मीडियावर वेगळीच माहिती पसरवली जात आहे.

सोशल मीडियावर सध्या मास्कबाबत पोस्ट शेअर केल्या जात आहेत. त्यानुसार जास्तवेळपर्यंत मास्क लावून राहिल्यामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता भासते. तसंच कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण रक्तात वाढतं. पण खरंच जास्तवेळ मास्क लावल्यामुळे माणसांच्या जीवला धोका असू शकतो का ? याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

WHO ने दिलेल्या माहितीनुसार अनेकदा जास्तवेळपर्यंत मास्क लावणं घातक ठरू शकते. कारण कार्बन डायऑक्साईडचा स्तर वाढल्यास श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. कार्बन डाइऑक्साइडमध्ये असणारे हाइपरकेनियामुळे डोकेदुखी, चक्कर येणं, डोळ्यांना व्यवस्थित न दिसणं, कानांना ऐकू न येणं अशा समस्या उद्भवू शकतात.

असं का होतं : साधारणपणे वातावरणात कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण 0.04 टक्के असतं. पण प्रमाण १० टक्क्यापेक्षा जास्त झाल्यास जीवघेणं ठरू शकतं. जेव्हा एखादी व्यक्ती मास्कचा वापर करते. त्यावेळी श्वास घेण्याची आणि श्वास सोडण्याची प्रक्रिया सुरू असते. मास्क जास्तवेळ घातल्यामुळे ऑक्सिजनचा प्रवाह कमी होतो आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं. कारण जेव्हा श्वास सोडला जातो. तेव्हा खूपवेळी ती हवा तोंडाभोवतीच असते.

अशा स्थितीत सोडलेल्या श्वासासोबतच म्हणजेच कार्बन डायऑक्साईडसोबत ऑक्सिजन घेतला जातो. सीओ2 रक्ततील ph नियंत्रणात ठेवतात. जास्त प्रमाण सीओ2 असल्यास रक्त एसिडीक होण्याची शक्यता असते. जेव्हा शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा हवा असतो. त्यावेळी उपलब्ध न झाल्याने श्वास घेण्याची समस्या वाढत जाते.

असा करा वापर : एन 95 मास्क आरोग्य विभागातील कर्मचारी वर्गासाठी आवश्यक आहे. पण तुम्ही या मास्कचा वापर करत असाल तर दीर्घकाळ वापरू नका. धावत असताना किंवा वेगाने चालताना एन95 मास्क काढून टाका. मास्कशिवाय घराबाहेर पडू नका. मास्क गरजेपेक्षा जास्त घट्ट बांधू नका.

घरी तयार केलेले मास्त जास्त फायदेशीर ठरतील कारण त्यामुळे श्वास घेण्यासाठी त्रास होत नाही. कारण त्यासाठी सुती कापडाचा वापर केला जातो. जर मास्क घातल्यानंतर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर सुरक्षित ठिकाणी आराम करा. डॉक्टरांचा सल्ला घ्या. .

घरी तयार केलेले मास्त जास्त फायदेशीर ठरतील कारण त्यामुळे श्वास घेण्यासाठी त्रास होत नाही. कारण त्यासाठी सुती कापडाचा वापर केला जातो. जर मास्क घातल्यानंतर तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होत असेल तर सुरक्षित ठिकाणी आराम करा. डॉक्टरांचा सल्ला घ्या.