संधिवात तरुण वयातही बळावू लागलाय, त्यावर 'हे' घरगुती उपाय करा अन्यथा होतील दुष्परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2021 17:14 IST2021-10-12T17:05:20+5:302021-10-12T17:14:45+5:30
संधिवात हा अनेकांच्या काळजीचे कारण बनला आहे. संधिवातावरील घरगुती उपचारपद्धती आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करुया या महत्वाच्या विषयाची माहिती घ्यायला...

संधिवात तरुण वयातही बळावू लागलाय, त्यावर 'हे' घरगुती उपाय करा अन्यथा होतील दुष्परिणाम
हल्ली संधिवाताचा त्रास आता वयाच्या चाळीशीनंतर नाही तर काहींनी आधीही होऊ लागला आहे. शरीराची योग्य पद्धतीने निगा राखली नाही की, अशा त्रासांना फार लहान वयातच अनेकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे संधिवात हा अनेकांच्या काळजीचे कारण बनला आहे. संधिवातावरील घरगुती उपचारपद्धती आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करुया या महत्वाच्या विषयाची माहिती घ्यायला...
संधिवात म्हणजे काय?
‘संधिवात’ या शब्दाची फोड केली तर संधि म्हणजे सांधा आणि वात म्हणजे दुखणे.. त्यामुळे सांधेदुखी यालाच ‘संधिवात’ असे म्हणतात. ज्या ठिकाणी दोन किंवा त्याहून अधिक हाडे एकत्र येत स्नायू आणि मांसपेशी जोडल्या जातात अशा भागाला आपण सांधा म्हणतो. संधिवातामध्ये सांध्याला सूज येऊ लागते. सूजलेला भाग खूप दुखू लागतो. मॉर्डन सायन्समध्ये अशा दुखण्यामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्याला आथ्ररायटिस किंवा सोरायटिक असेही म्हणतात.
संधिवातावर अनेक उपचारपद्धती आहेत.पण तुम्ही घरीच योग्य पद्धतीने काळजी घेतली तर तुम्हाला त्यापासून थोडा आराम मिळू शकेल.
संधिवातामुळे तुमचे सांधे दुखत असले तरी देखील तुम्हाला त्यांची हालचाल राखणे फारच गरजेचे असते. जर तुम्हाला संधीवातापासून सुटका हवी असेल तर तुम्ही नियमित थोडा का असेना व्यायाम करायला सुरुवात करा. शक्य असेल तितका व्यायाम तुमच्या सांधेदुखीला कमी करण्यास मदत करु शकतो. तुमचे अंग दुखते म्हणून तुम्ही तसेच पडून राहात असाल तर तुम्हाला त्याचा अधिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे योग्य सल्ला घेऊन चालणे, धावणे, सूर्यनमस्कार काही सोपी आसने नक्की करुन पाहा.
संधिवातासाठी कारणीभूत असलेली महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे वाढते वजन. त्यासाठी कारणीभूत म्हणजे तुमचा आहार. तुमच्या शरीरात प्रोटीनयुक्त आहार जाणे फारच गरजेचे असते. प्रोटीन कशातून मिळते असा तुम्हाला प्रश्न असेल तर तुम्ही दूध, अंडी, चिकन, पालेभाज्या, कडधान्य यांचा अधिकाधिक समावेश तुमच्या आहारात करायला हवा.
हळदीमधील नैसर्गिक घटक हे शरीराची जळजळ कमी करण्यास मदत करतात. त्यामुळेच संधिवात असलेल्यांनी त्यांच्या आहारात हळदीचा समावेश करावा असे म्हटले जाते. भारतीय जेवणामध्ये हळद ही अगदी हमखास वापरली जाते. पण तरीही त्याचा वापर तुम्ही करत नसाल तर चिमूटभर हळदीचा उपयोग तरी करा.
किचनमध्ये अगदी हमखास असणारे आले हे आरोग्यासाठी फारच फायदेशीर असते. यामधील दाहनाशक घटक तुमच्या आरोग्यासाठी चांगले असतात. त्यामुळे तुम्ही आहारात आल्याचा समावेश करा. तुम्ही आल्याचा चहा करुन प्यायाला तरी चालेल. आले पाण्यात टाकून तुम्ही त्याही पाण्याचे सेवन करु शकता. पण त्याचे सेवनही प्रमाणात असू द्या.
संधिवात असणाऱ्यांनी त्यांचा आहार हा चांगला ठेवलाच पाहिजे पण आहारासोबत चयापचय क्रिया चांगली राहण्यासाठी अगदी हमखास घ्यायला हवी अशी गोष्ट म्हणजे ग्रीन टी. ग्रीन टी मुळे तुमची चयापचय क्रिया सुधारते. तुमच्या पोटाचे आरोग्यही चांगले राहते. त्यामुळे तुम्ही ग्रीन टीचे सेवन करायला हवे.
संधिवातासाठी आंबट फळांचे सेवन हे वर्ज्य आहे. पण ही फळ म्हणजे चिंच, बोरं पण तुम्ही मोसंबी, गोड संत्र, लिंबूपाणी अशा पदार्थांचे सेवन करु शकता. अनेकदा संधिवात असणाऱ्यांना आंबवलेले पदार्थ अजिबात खाऊन चालत नाहीत. हे पदार्थ म्हणजे इडली, डोसावगैरे