HMPV Virus : 'या' वयाच्या मुलांना HMPV व्हायरसचा जास्त धोका; औषध किंवा लस नाही, तज्ज्ञांनी दिल्या टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 12:40 IST2025-01-07T12:40:25+5:302025-01-07T12:40:46+5:30

HMPV Virus : चीनमध्ये दहशत पसरवणाऱ्या HMPV (ह्युमन मेटाप्युमोव्हायरस) चे पाच रुग्ण भारतातही आढळून आले आहेत.

HMPV Virus dangerous for 2 year old kids no vaccine and drug available expert advice how to safe | HMPV Virus : 'या' वयाच्या मुलांना HMPV व्हायरसचा जास्त धोका; औषध किंवा लस नाही, तज्ज्ञांनी दिल्या टिप्स

HMPV Virus : 'या' वयाच्या मुलांना HMPV व्हायरसचा जास्त धोका; औषध किंवा लस नाही, तज्ज्ञांनी दिल्या टिप्स

चीनमध्ये दहशत पसरवणाऱ्या HMPV (ह्युमन मेटाप्युमोव्हायरस) चे पाच रुग्ण भारतातही आढळून आले आहेत. आठ महिने आणि तीन महिने वयाच्या दोन मुलांमध्ये एचएमपीव्ही संसर्ग आढळून आला. तिसरी केस गुजरातमध्ये आढळून आली. जिथे दोन महिन्यांचा मुलगा एचएमपीव्ही व्हायरस पॉझिटिव्ह आढळला. याशिवाय चेन्नईमध्ये दोन रुग्णांची माहिती मिळाली आहे. 

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या व्हायरसच्या रुग्णांवर विशेष देखरेख ठेवली पाहिजे, परंतु एका तज्ञाने असा दावा केला आहे ज्यामुळे तुम्हाला खूप भीती वाटेल. दोन वर्षांखालील मुलांना या व्हायरसचा सर्वाधिक धोका असल्याचं त्यांनी सांगितलं. सर्वात भीतीदायक बाब म्हणजे हा व्हायरस २००१ मध्ये ओळखला गेला असला तरी आजपर्यंत त्यावर कोणतेही औषध किंवा लस तयार केलेली नाही.

किती धोकादायक आहे HMPV?

या संदर्भात एबीपी लाइव्हने पीसीआयआरचे अध्यक्ष पल्मोनरी, क्रिटिकल केअर आणि स्लीप मेडिसिन, डॉ. जीसी खिलनानी यांच्याशी संवाद साधला. ते म्हणाले की, कोरोना महामारीचा कहर कोणीही विसरू शकत नाही. जगात असे हजारो आणि लाखो व्हायरस आहेत. HMPV ची ओळख २००१ मध्ये झाली. त्यामुळे खोकला आणि सर्दी होते. विशेषत: पाच वर्षांखालील मुलांवर याचा परिणाम होतो आणि दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना याचा धोका खूप जास्त असतो. 

डॉ. जीसी खिलनानी यांच्या म्हणण्यानुसार, यावेळी चिंतेची बाब म्हणजे व्हायरसचे म्यूटेशन अद्याप आढळलेलं नाही. हे कोणते म्यूटेशन आहे हे अद्याप सांगता येत नाही. याशिवाय, व्हायरसच्या तीव्रतेबद्दल कोणतीही माहिती नाही. जर तो म्यूटेड झाला तर तो कोरोनासारखा पसरू शकतो. काही लोक म्हणत आहेत की, हा नवीन व्हायरस आहे पण तसं नाही.

लहान मुलांना किती धोका?

डॉ. खिलनानी म्हणाले की, हा व्हायरस दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना आणि वृद्धांना त्वरीत प्रभावित करतो. या व्हायरसचा कालावधी तीन ते सहा दिवसांचा असतो. ताप, सर्दी आणि खोकला हीच त्याची लक्षणं आहेत. ज्यांची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे अशा लोकांवर याचा त्वरीत परिणाम होतो. अशा लोकांना आयसीयूमध्येही दाखल करावे लागू शकते.

कोणतीही लस किंवा औषध नाही

डॉ. खिलनानी यांच्या मते, ह्यूमनन मेटान्यूमोव्हायरससाठी कोणतीही लस नाही. त्याच वेळी, आमच्याकडे त्याचे अँटी-व्हायरल औषध देखील नाही. त्याच्यावर उपचार लक्षणांनुसार केले जातात. त्यामुळेच आतापर्यंत उघडकीस आलेल्या सर्व प्रकरणांमध्ये लक्षणांच्या आधारे रुग्णावर उपचार केले जात आहेत.

तज्ज्ञांनी दिल्या या टिप्स

तज्ज्ञांच्या मते, सर्वप्रथम हा व्हायरस कसा पसरतो हे समजून घेण्याची गरज आहे. ते म्हणाले की, संक्रमित व्यक्तीने टेबल, खुर्ची आणि दरवाजा यांसारख्या निर्जीव वस्तूंना स्पर्श केल्यास व्हायरसचा संसर्ग होऊ शकतो. संक्रमित व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी गेल्यास हा व्हायरस आणखी पसरू शकतो. सर्दी, खोकला किंवा सर्दीची लक्षणं आढळल्यास सार्वजनिक ठिकाणी जाणं टाळावं. स्वच्छ हात धुवा, मास्कचा वापर करा यासारखी खबरदारी घेण्याची गरज आहे. 

Web Title: HMPV Virus dangerous for 2 year old kids no vaccine and drug available expert advice how to safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.