(Image Credit : Bustle)
सध्याच्या धावपळीच्या लाइफस्टाइलमध्ये स्वत:ला फिट ठेवणं एखाद्या आव्हानापेक्षा कमी नाहीये. ऑफिसमधील कामाचा स्ट्रेस, स्पर्धा आणि दैनंदिन जीवनातील वेगवेगळे प्रश्न यामुळे स्वत:ला फिट ठेवण्याची गरज वाढली आहे. अशात HIIPA हा फिटनेसचा नवा ट्रेन्ड तुमच्या कामात येऊ शकतो. एकदा ६ सेकंद ते ४ मिनिटांपर्यंत ही एक्सरसाइज वेगाने केली जाते. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी ही एक्सरसाइज अधिक फायदेशीर ठरु शकते.
हिप्पा एक्सरसाइज हाय इन्टेसिटी असलेली आहे. तरुणांमध्ये ही एक्सरसाइज चांगली लोकप्रिय आङे. कारण यासाठी वेळ कमी द्यावा लागतो आणि कॅलरी सुद्धा जास्त बर्न होतात. एक्सपर्ट सांगतात की, यात १ किंवा २ मिनिटांसाठी वेगाने एक्सरसाइज करावी लागते आणि नंतर आराम करावा लागतो. नंतर पुन्हा एकदा वेगाने एक्सरसाइज केली जाते. याचा कालावधी ६ सेकंद ते ४ मिनिटे असतो, ज्यातील ३० सेकंद ते ४ मिनिटांचा कालावधी हा आरामासाठी असतो. या एक्सरसाइजने शरीर स्ट्रॉंग होतं आणि क्षमताही वाढते.
काय आहे हिप्पा वर्कआऊट
हाय इन्टेसिटी इंटरवल ट्रेनिंगला एचआयआयटी असंही म्हणतात. ही एक्सरसाइज फार वेगाने केली जाते. त्यामुळेच यासाठी कमी वेळ देऊनही या एक्सरसाइजचे शरीराला अनेक फायदे मिळतात. खास बाब ही आहे की, जर तुम्ही एक्सरसाइज रोज कराल तर तुम्हाला कार्डिओ आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग दोन्हींचे फायदे मिळतील. या वर्कआऊटला अॅथलीट वर्कआउट सुद्धा म्हटलं जातं. वजन कमी करण्यासाठी ही एक्सरसाइज एक चांगला पर्याय ठरु शकते.
शरीरानुसार करा निवड
यासाठी तुम्ही रोज केवळ ३० मिनिटे वेळ काढला तर तुमच्या वेगवेगळ्या समस्या सहज दूर होतील. यात तुम्ही एक्ससाइज शरीरानुसार निवडू शकता. हिप्पा अनेकप्रकारचे पॅकेज असतात, ज्यात तुमच्या शरीराच्या क्षमतेनुसार एक्सरसाइज दिली जाते.
वेगळी तयारी करावी लागत नाही
HIIPA एकप्रकारे HIIPA सिद्धांतावर काम करते. पण ही एक्सरसाइज करण्यासाठी विशेष अशी तयारी करावी लागत नाही. उदाहरणार्थ जर तुम्ही पायऱ्या चढून जात असाल तर वेगाने चढाव्यात किंवा चालत असाल तर वेगाने चालावे. ज्यांना स्वत:ला फिट ठेवायचे असेल लिफ्टची वाट पाहत बसण्याऐवजी पायऱ्यांचा वापर करा. वेगाने पायऱ्या चढा आणि थांबा, पुन्हा वेगाने पायऱ्या चढा.
HIIPA चे तसे तर भरपूर लाभ आहेत, पण सतत बसून राहणाऱ्यांना याचा अधिक फायदा होतो. तसेच यासाठी फार मेहनतही घ्यावी लागत नाही. फक्त ही एक्सरसाइज करण्यापूर्वी शरीर यासाठी तयार करा. थोडा वार्मअप करणे गरजेचं आहे. हा वार्मअपने तुमच्या मांसपेशींमध्ये रक्तप्रवाह वाढेल आणि शरीर हलकं व गरम होईल. ज्याकारणाने तुम्ही चांगली एक्सरसाइज तर करु शकालच आणि काही त्रासही होणार नाही.
(टिप : वरील लेखातील टिप्स आणि सल्ले हे केवळ माहिती म्हणूण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. याकडे प्रोफेशनल टिप्स म्हणूण बघता येणार नाहीत. ही एक्सरसाइज करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. कारण प्रत्येकाला या एक्सरसाइजचा फायदा होईल असे नाही.)