सध्या पाठीच्या दुखण्यामुळे अनेकजण हैराण आहेत. पाठदुखीची अनेक कारणं आहेत. खरं तर अनियमित जीवनशैली पाठ आणि कंबर दुखीच्या प्रमुख कारणांपैकी एक आहेत. त्यामुळे प्रत्येक दिवसाची दिनचर्या प्रभावित होऊ शकते. साधारणतः लोक पाठीच्या हलक्या दुखण्याकडे दुर्लक्षं करतात. कारण अनेकांचा असा गैरसमज होतो की, पाठदुखी किंवा कंबरदुखी धावपळ झाल्यामुळे किंवा चुकीच्या पद्धतीने झोपल्यामुळे होत आहे. पाठ आणि कंबरदुखी अनेक कारणांमुळे होऊ शकते. पाठ आणि कंबर दुखीचं सर्वात मोठं कारण म्हणजे, हाडं कमकुवत होणं. दैनंदिन जीवनातील काही सवयींमुळे मणक्यावर परिणाम होतो. अशा चुकीच्या सवयी सुधारूण तुम्ही कंबर दुखी आणि पाठदुखीपासून बचाव करू शकता. 

सतत धुम्रपान करणं 

सिगारेटमुळे उद्भवणाऱ्या वेगवेगळ्या समस्यांसोबतच मणक्याच्या समस्याही उद्भवतात. निकोटीन मणक्याच्या हाडापर्यंत ऑक्सिजन पोहचण्यापासून रोखतो. योग्य पद्धतीने ऑक्सिजन न पोहोचल्यामुळे मणक्यावर परिणाम होतो. 

हाय हिल्स वेअर करणं 

हाय हिल्स देखील आपल्या मणक्याची हाडं कमजोर करण्यासाठी कारणीभूत ठरतात. हाय हिल्स सॅन्डल वेअर केल्याने आपल्या पायांच्या स्नायूंवर दबाव येतो. तसेच पाठ आणि कंबरेमध्ये वेदना होतात. त्यामुळे तुम्ही वुटवेअर्स खरेदी करताना फॅशन सोबतच पायांच्या आरोग्याचाही विचार करणं आवश्यक आहे. 

(Image Credit : Yaasa)

तुमचं अंथरूणही ठरतं कारण 

तुमच्या मणक्याची हाडं कमकुवत होण्याच्या प्रमुख कारणांमध्ये तुमच्या बिछान्याचाही समावेश होऊ शकतो. तुम्हाला दर 5 ते 7 वर्षांमध्ये गादी बदलणं गरजेचं आहे. कारण काही वर्षांमध्ये गादीचा कापूस गोळा होतो. त्यामुळे झोपताना मणक्यावर प्रेशर येतं आणि कंबर दुखी किंवा पाठदुखीच्या समस्या उद्बवतात. 

तणावाची कारणं 

तणावही पाठदुखी आणि कंबरदुखीचं सर्वात मोठं कारण आहे. जेव्हा तुम्ही तणावामध्ये असता. तेव्हा तुमची मान आणि पाठीच्या स्नायूंवर अनावश्यक दबाव पडतो. जर तुम्ही सतत तणावामध्ये असाल तर मांसपेशींवर ताण येतो आणि स्नायू दुखू लागतात. परिणामी मान, पाठ आणि कंबर दुखू लागते. 

जास्त वेळापर्यंत एकाच जागेवर बसणं 

सतत एकाच जागी बसल्यामुळेही मणक्यावर दबाव येतो. त्यामुळे तुम्हाला कंबरदुखी होण्याची शक्यता आणखी वाढते. बराच वेळ एकाच जागी बसला असाल तर थोड्या थोड्या वेळाने उठून फिरून या. बराच वेळ एकाच जागी बसण्याऐवजी प्रत्येक तासाला पाच मिनिटं का होईना उठून फिरून येणं फायदेशीर ठरतं. 

(टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)


Web Title: High heels and smoking also causes of back pain
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.