शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कोणत्या कारणांमुळे होतो नागीण आजार? जाणून घ्या याची गंभीर लक्षणे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 16:44 IST

Herpes  Disease : यात रुग्णाच्या शरीराच्या एका भागात एकाच जागी लाल पुरळ येतात. अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, ४० दिवसांनंतर या पुरळ अधिक येऊ लागतात. यात असह्या अशा वेदना होतात.  

Herpes  Disease : नागीण (Herpes  Disease) हा आजार कुणाला झालेला तुम्ही पाहिला असेल किंवा त्याबाबत नक्कीच ऐकलं असेल. हा आजार झाल्यास त्वचेवर बारीक बारीक पुरळ निघतात. यात रुग्णाच्या शरीराच्या एका भागात एकाच जागी लाल पुरळ येतात. अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, ४० दिवसांनंतर या पुरळ अधिक येऊ लागतात. यात असह्या अशा वेदना होतात.  

संसर्गजन्य आजार

ही गंभीर समस्या चिकन पॉक्स म्हणजे काजण्याचा वायरस वेरिसेला जोस्टर वायरसमुळे होते. शरीराच्या एका भागावर पुरळ असलेले चट्टे आल्याने रुग्णाला वेदनाही होतात आणि तापही येतो. हा एक संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे काळजी घेण्याची गरज जास्त आहे. 

कुणाला होतो हा आजार?

सामान्यत: हा आजार त्या व्यक्तींना होतो ज्यांना काजण्या झाल्या असतील. काजण्या झाल्यावर त्यातील वेरिसेला झोस्टर हा वायरस आधीच शरीरात असेल तर तुम्हाला हा नागीण आजार होऊ शकतो. चिकन पॉक्स झाल्यावर हा वायरस नर्वस सिस्टीममध्ये जातो. अनेक वर्ष तो तिथे तसाच शांत पडून असतो. 

का होतो हा आजार?

हा आजार का डोकं वर काढतो, याचं स्पष्ट कारण समोर आलेलं नाहीये. असे मानले जाते की, जेव्हा आपल्या शरीराची रोगप्रितकारक शक्ती कमी होते तेव्हा हा वायरस नर्वस सिस्टीममधून बाहेर येऊन सक्रिय होतो आणि आपल्या त्वचेपर्यंत पोहोचतो. वाढत्या वयासोबत याचा धोकाही अधिक वाढतो.

हा आजार पूर्ण शरीरावर कुठेही होतो. जास्तकरून चेहरा छाती पोट व हात या अवयवांवर हा आढळतो. शरीरात कमी झालेली रोगप्रतिकारक शक्ती व पित्ताची वाढती मात्रा यांचे प्रतिक म्हणजेच नागीण होय. सततची जागरणे, पित्त वाढवणारा आहार,जेवणाच्या अनियमित वेळा,या सगळ्यांमुळे शरीरातलं पित्त वाढून नागिण होते. 

हा आजार झाल्यावर व्यक्तीच्या शरीरावर लाल पुरळ येते. त्यामुळे त्याला वेदना सुरु होतात. पुरळींमध्ये वेदना होणे या आजाराचं सर्वात प्रमुख कारण आहे. हा आजार झाल्यास डोकेदुखी, सांधेदुखी, थकवा आणि ताप इत्यादीही समस्या होतात. 

किती दिवसात बरा होतो आजार? 

हा आजार बरा करण्यासाठी अॅंटी वायरस मेडिसिन एसायक्लोविर दिलं जातं. जेणेकरुन शरीरातील वायरस नष्ट व्हावे. त्यासोबतच फॅमसायक्लोविर आणि वॅलासायक्लोविर ही औषधही दिली जातात. हा आजार बरा होण्यासाठी १० ते २० दिवसांचा कालावधी लागतो. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य