पुश अप्स कुणी करावे कुणी करू नये? 'या' ७ स्थितींमध्ये तर टाळाच टाळा....
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 11:14 IST2020-01-21T11:03:59+5:302020-01-21T11:14:23+5:30
आजकाल लोक स्वत:ला फिट ठेवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करतात जसे की, व्यायाम, योगा, डायटिंग, जिम इत्यादी. शरीर फिट आणि स्लिम ठेवण्यासाठी जिममध्ये अनेक प्रकारच्या एक्सरसाइज करतात.

पुश अप्स कुणी करावे कुणी करू नये? 'या' ७ स्थितींमध्ये तर टाळाच टाळा....
(Image Credit : hellobacsi.com)
आजकाल लोक स्वत:ला फिट ठेवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करतात जसे की, व्यायाम, योगा, डायटिंग, जिम इत्यादी. शरीर फिट आणि स्लिम ठेवण्यासाठी जिममध्ये अनेक प्रकारच्या एक्सरसाइज करतात. त्यातीलच एक आहे पुश अप्स. पुश अप्स हा फारच लोकप्रिय व्यायाम आहे. हा व्यायाम कुणीही कोणत्याही उपकरणाशिवाय सहजपणे करू शकतात. इतकेच नाही तर या एकट्या व्यायामाने फायदेही अनेक होतात. पण तुम्हाला माहीत आहे का की, काही लोकांनी पुश अप्स करू नये? अशा काही स्थिती असतात जेव्हा पुश अप्स अजिबात करू नये. चला जाणून घेऊ याची कारणे....
१) सांधेदुखी
ज्या लोकांना कोपर, मनगट आणि खांद्याच्या जॉइंट्सची समस्या असेल त्यांनी पुश अप्स करू नये. जर तुम्ही ऑस्टिओअर्थरायटिसने पीडित असाल तर पुश अप्स तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. अशा स्थितीत डॉक्टरांनी सल्ला दिल्याशिवाय पुश अप्स करू नये. तुम्हाला या समस्या असतील तर व्यायाम बंद करण्याऐवजी किंवा पुश अप्स करण्याऐवजी तुम्ही पर्यायी व्यायाम करू शकता.
२) खांदेदुखी
जर कुणाला आधीपासूनच खांदेदुखीची समस्या असेल किंवा रोटेटर कफ किंवा बायसेफ टेंडन सर्जरी झाली असेल तर त्यांनीही पुश अप्स अजिबात करू नये. असं केलं तर त्या व्यक्तीच्या खांद्याची समस्या अधिक वाढू शकते.
३) ज्यांची सुरूवात आहे
पुश अप्स करण्यासाठी तुमच्या शरीराचा वरचा भाग आणि पाठीचा कणा मजबूत असणं गरजेचं आहे. जर तुम्ही नव्यानेच व्यायाम करणं सुरू केलं असेल तर तुमच्यासाठी पुश अप्स त्रासदायक ठरू शकतात. पुश अप्स सुरू करण्याआधी तुमचे मसल्स मजबूत करा. जेणेकरून तुम्हाला काही नुकसान होणार नाही.
४) महिलांसाठी
महिलांसाठी पुश अप्स करणं फारच आव्हानात्मक ठरू शकतं. कारण महिलांमध्ये पुरूषांच्या तुलनेत केवळ ५० टक्केच स्ट्रेंथ असते. पण असं म्हणता येणार नाही की, महिला पुश अप्स करू शकत नाहीत. पण हे करण्यासाठी महिलांना आधी त्यांनी सीरिअस वर्कआउट आणि स्ट्रेंथ बिल्डींग करावी.
५) शरीराचा वरचा भाग कमजोर
जर तुमच्या शरीराचा वरचा भाग कमजोर असेल तर तुम्ही पुश अप्स करू नका. कारण पुश अप्स करण्यासाठी तुमचे हाताचे कोपरे, हात आणि कंबर मजबूत असणं गरजेचं आहे. जर असं नसेल तर तुम्हाला इजा होऊ शकते. त्यामुळे जर तुम्ही पुश अप्स करू शकत नसाल कर फिटनेस ट्रेनरसोबत बोला आणि योग्य कारण जाणून घेऊन मग एक्सरसाइज करा.
६) वजन जास्त असणे
पुश अपला वजन कमी करण्याचा बेस्ट व्यायाम मानलं जातं. पण जर तुमचं वजन जास्त असेल तर पुश अप करू नका. जर तुम्ही असं करत असाल तर तुमच्या मनगटात वेदना होऊ शकतात. कारण वजन जास्त असल्याने तुमच्या शरीराचा संपूर्ण भार हा मनगटावर येतो. पुश अप करण्याआधी तुमचं वजन कमी करा. म्हणजे सुरूवातीलाच पुश अप ट्राय करू नका. दुसऱ्या एक्सरसाइजने आधी वजन कमी करा.
७) पुश अपची योग्य माहीत नसेल तर
यात अजिबात दुमत नाही की, पुश अप एक प्रभावी एक्सरसाइज आहे. पण जर ही एक्सरसाइज करण्याची योग्य पद्धत तुम्हाला माहीत नसेल तर करू नका. योग्य पद्धत माहीत नसताना ही एक्सरसाइज केली तर तुम्हाला शारीरिक समस्या होऊ शकतात. जेव्हाही पुश अप करणं सुरू कराल तेव्हा एखाद्या ट्रेनरकडून योग्य माहिती घ्या.