महिलांमध्ये 'या' वयानंतर वाढतो हृदयरोगांचा धोका, काय घ्यावी काळजी?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2019 09:54 AM2019-11-21T09:54:46+5:302019-11-21T10:01:51+5:30

वाढत्या वयासोबतच पुरूषांप्रमाणेच महिलांमध्येही हार्ट डिजीज म्हणजेच हृदयरोगांचा धोका वाढू लागतो. यात खास बाब ही आहे की, महिलांमध्ये या आजाराची लक्षणे खासकरून मेनोपॉजनंतर बघायला मिळतात.

Heart disease high risk in women | महिलांमध्ये 'या' वयानंतर वाढतो हृदयरोगांचा धोका, काय घ्यावी काळजी?

महिलांमध्ये 'या' वयानंतर वाढतो हृदयरोगांचा धोका, काय घ्यावी काळजी?

Next

(Image Credit : indiatvnews.com)

वाढत्या वयासोबतच पुरूषांप्रमाणेच महिलांमध्येही हार्ट डिजीज म्हणजेच हृदयरोगांचा धोका वाढू लागतो. यात खास बाब ही आहे की, महिलांमध्ये या आजाराची लक्षणे खासकरून मेनोपॉजनंतर बघायला मिळतात. मात्र, महिलांमध्ये मेनोपॉज कार्डिओवॅक्युलर डिजीजचं कारण नसतं. पण या स्थितीदरम्यान म्हणजे जेव्हा महिला मेनोपॉज स्थितीत असतात, त्यावेळी अशा अनेक गोष्टी बदलतात त्या हृदयरोगाच्या कारण ठरतात.

(Image Credit : newsnetwork.mayoclinic.org)

सामान्यपणे महिलांमधे मेनोपॉजची स्थिती ५४ वयादरम्यान येते. अशात महिलांच्या आरोग्यावर अनेकप्रकारच्या समस्या होता. या समस्या हार्मोनल बदलामुळे होतात. काही रिसर्चमधून असं समोर आलं आहे की दर ३ पैकी एका महिलेत यादरम्यान कार्डिओवॅक्युलर डिजीजची लक्षणे दिसू लागतात. पण महिलांमध्ये हार्ट अटॅकची समस्या मेनोपॉजच्या जवळपास १० वर्षांनंतर बघायला मिळते. पण आता हार्ट अटॅकने महिलांच्या मृत्यूची आकडेवारी वाढत जात आहे.

(Image Credit : healthcentral.com)

तज्ज्ञांचं यावर मत आहे की, ज्या महिला हेल्दी लाइफस्टाईल फॉलो करतात, नियमितपणे एक्सरसाइज करतात, त्यांना मेनोपॉजदरम्यान या आजारांचा धोका कमीच असतो. मात्र, या फॅमिली हिस्ट्रीही मोठी भूमिका बजावते. महिलांनी आपल्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतली पाहिजे आणि हेल्दी रूटीन फॉलो करावं.

डॉ. नीका गोल्डबर्ग, एक हृदयरोग तज्ज्ञ आणि अमेरिकन हार्ट असोसिएशनचे वॉलेन्टिअर आहेत. त्यांच्यानुसार, मेनोपॉजदरम्यान महिलांना हाय फॅट डाएट, स्मोकिंग किंवा कमी वयात लागलेल्या चुकीच्या सवयी फार जास्त प्रभावित करू शकतात. 

(Image Credit : healthimpactnews.com)

डॉक्टर गोल्डबर्ग म्हणाले की, 'मेनोपॉज हा काही आजार नाही. ही महिलांच्या मासिक पाळीशी संबंधित एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. त्यामुळे महिलांसाठी हे गरजेचं आहे की, या स्थितीत पोहोचल्यावर त्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी आणि नियमित चेकअप करावं.


Web Title: Heart disease high risk in women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.