लहानमुलांमधील हृदयविकाराचा धोका बळावतोय, पालकांनी अजिबात दुर्लक्ष करु नये 'ही' लक्षणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 13:27 IST2022-06-13T13:25:20+5:302022-06-13T13:27:49+5:30
धक्कादायक बाब म्हणजे हृदयविकार लहानमुलांमध्येही वाढीस लागला आहे. मोठ्या माणसांमध्ये हा विकार काळानुसार बळावतो पण लहान मुलांमध्ये हा आजार जन्मजात असू शकतो.

लहानमुलांमधील हृदयविकाराचा धोका बळावतोय, पालकांनी अजिबात दुर्लक्ष करु नये 'ही' लक्षणे
बदलती जीवनशैली, फास्ट फुडचे अतिसेवन, व्यायामाचा अभाव यामुळे अनेक आजार बळावु लागले आहेत. त्यातील एक आजार म्हणजे हृदयविकार. सामान्यत: हृदयविकार मोठ्या माणसांमध्ये आढळतो. पण धक्कादायक बाब म्हणजे हृदयविकार लहानमुलांमध्येही वाढीस लागला आहे. मोठ्या माणसांमध्ये हा विकार काळानुसार बळावतो पण लहान मुलांमध्ये हा आजार जन्मजात असू शकतो.
अॅट्रीयल सेप्टल डिफेक्ट्स
हा असा आजार आहे जो जन्माच्यावेळीच मुलांना असू शकतो. यातील काही केसेसमध्ये स्ट्रोक येण्याची शक्यता असते. आपल्या हृद्यामध्ये चार व्हॉल्व असतात. या पैकी वरच्या व्हॉल्वच्या पडद्याला छेद असल्यास रक्त एकमेकांमध्ये मिसळते. यावर सर्जरी हा एकच उपाय आहे.
या रोगाची लक्षणे
- श्वास कमी होणे
- लवकर थकणे
- पोटात आणि पायावर सुज
- हृद्यांच्या ठोक्याचा वेग कमी होणे
- हृदयातून विचित्र आवाज येणे