Health Tips : रक्त कमी झाल्यावर शरीर देतं हे ५ संकेत, ही लक्षणं दिसली तर वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2022 02:54 PM2022-01-15T14:54:37+5:302022-01-15T14:56:57+5:30

Hemoglobin Level : शरीरात हीमोग्लोबिनचं काम ऑक्सीजनचा पुरवठा करणं आहे. रक्तात हीमोग्लोबिनची कमतरता झाल्याने अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक समस्या तुम्हाला शिकार बनवू शकतात.

Health Tips : Warning signs of low hemoglobin level in body | Health Tips : रक्त कमी झाल्यावर शरीर देतं हे ५ संकेत, ही लक्षणं दिसली तर वेळीच व्हा सावध!

Health Tips : रक्त कमी झाल्यावर शरीर देतं हे ५ संकेत, ही लक्षणं दिसली तर वेळीच व्हा सावध!

Next

hemoglobin Level : शरीरात रक्त कमी असल्याने आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या होऊ लागतात. सतत थकवा येणे, कमजोरी आणि चक्कर येणे अशा समस्या हीमोग्लोबिन कमी होण्याच्या संकेत आहेत. रक्त कमी झाल्याने तुम्ही एनीमियाचे शिकार होऊ शकता. महिलांमध्ये ही समस्या जास्त बघायला मिळते. शरीरात हीमोग्लोबिनचं काम ऑक्सीजनचा पुरवठा करणं आहे. रक्तात हीमोग्लोबिनची कमतरता झाल्याने अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक समस्या तुम्हाला शिकार बनवू शकतात.

हीमोग्लोबिन कमी होण्याची कारणं

रोजच्या आहारात आयर्नची कमतरता असल्याने हीमोग्लोबिन कमी होतं. महिलांमध्ये प्रेग्नेन्सीमुळे शरीरात हीमोग्लोबिनचं प्रमाण कमी होऊ शकतं. मासिक पाळी दरम्यान जास्त ब्लीडिंग याचं कारण ठरू शकते. जर शरीरात हीमोग्लोबिनची कमतरता असेल तर जंक फूडचं सेवन करणं बंद करा. व्हिटॅमिन आणि कॅल्शिअमच्या कमतरतेमुळेही ही समस्या होऊ शकते. त्यामुळे व्हिटॅमिन आणि कॅल्शिअम असलेले पदार्थ खावेत. 

या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष

- फार जास्त थकवा जाणवणे, त्वचेवर पिवळेपणा येणे आणि कमजोरी जाणवणे हे हीमोग्लोबिन कमी असल्याचे संकेत आहेत. शरीरात रक्ताची कमतरता झाल्यावर हार्ट बीट वेगाने होण्याची समस्याही होऊ शकते. याने श्वास घेण्यास समस्या होऊ शकते.

- जेव्हा शरीरात रक्त कमी होतं तेव्हा ऑक्सीजनही कमी होऊ लागतं. याने तुम्हाला श्वास घेण्यास समस्या होऊ लागते. तसेच जडपणा जाणवू लागतो. ऑक्सीजन कमी झाल्याने शरीरात ब्लड सर्कुलेशनही कमी होऊ शकतं. याने इतरही काही समस्या होऊ शकतात.

- हीमोग्लोबिन कमी झाल्यावर डोकेदुखी आणि छातीत दुखण्याची समस्याही होऊ शकते. जेव्हा शरीरात हीमोग्लोबिनचं प्रमाण कमी होतं, तेव्हा तुम्हाला थकवा आणि कमजोरी जाणवू लागते. अशात तुम्ही कोणतंही छोटं काम करून लवकर थकाल.

- शरीरात रक्ताची कमतरता झाल्यावर Arthritis, कॅन्सर आणि किडनीसंबंधी आजारांचाही धोका वाढू शकतो.

काय खावं?

जर तुम्हा हीमोग्लोबिन कमी असण्याची समस्या असेल तर डेली डाएटमध्ये बदल करा. आयर्न असणारे पदार्थ अधिक खावीत. वेगवेगळ्या पालेभाज्या, गाजर, बीट यांचाही आहारात समावेश करा. तसेच व्हिटॅमिन सी ची कमतरता पूर्ण करण्यासाठी द्राक्ष, लिंबू, संत्री, आंबे, कीवी सारखे फळही खावीत. तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घ्यावेत.

(टिप - वरील लेखातील माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. यात आम्ही कोणताही दावा करत नाही. तुम्हाला  काही समस्या जाणवत असेल तर वरील काही टिप्स वापरण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा.)

हे पण वाचा :

रस्त्यांवरील मैलाच्या दगडांचे रंग वेगवेगळे का? प्रत्येक रंग काय सांगतो आपल्याला?
 

Web Title: Health Tips : Warning signs of low hemoglobin level in body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app