सकाळी झोपेतून उठल्यावर कराल या चुका तर दिवस जाईल खराब!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 17:35 IST2023-08-01T17:35:23+5:302023-08-01T17:35:41+5:30
Morning Habits to Change : काही लोक सकाळी लवकर उठून योगा करतात, काही फिरायला जातात तर काही लोक जिमला जातात. आरोग्य चांगलं रहावं हा त्यामागचा उद्देश असतो.

सकाळी झोपेतून उठल्यावर कराल या चुका तर दिवस जाईल खराब!
Morning Habits to Change : तुमची सकाळ कशी होते यावर तुमचा पूर्ण दिवस अवलंबून असतो. तसेच सकाळच्या अनेक चुकांमुळे आरोग्यही बिघडतं. त्यामुळे सकाळी काय करावे आणि काय करू नये याबाबत डॉक्टर किंवा घरातील मोठे लोक नेहमीच सांगत असतात.
काही लोक सकाळी लवकर उठून योगा करतात, काही फिरायला जातात तर काही लोक जिमला जातात. आरोग्य चांगलं रहावं हा त्यामागचा उद्देश असतो. अशात आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्ही सकाळी टाळल्या तर तुमचं आरोग्यही चांललं राहील आणि तुमचा दिवसही चांगला जाईल.
काय टाळावे
तंबाखू, मावा खाणे - अनेकांना स्मोकिंगसारखीच झोपेतून उठल्या उठल्या तंबाखू किंवा मावा खाण्याची सवय असते. अनेकजण टॉयलेटला जाण्याआधी तंबाखू खातात. या गोष्टी आरोग्यास फार धोकादायक आहेत. त्यामुळे सकाळ असो किंवा दिवसा कधीही या गोष्टी टाळणे गरजेचे आहे.
स्मोकिंग - स्मोकिंग करणे आरोग्यासाठी नुकसानदायक आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. पण काही लोकांना झोपेतून उठल्या उठल्या स्मोक करण्याची सवय असते. हे आणखी जास्त धोकादायक ठरू शकतं. याने कर्करोग होण्याची शक्यता अधिक वाढते.
अल्कोहोल - सकाळी अल्कोहोलचं सेवन केल्याने अनेक शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागतं. अशाने वाढत्या वयात होणार्या व्याधी आणि रोग आधीच शरीरात घर करू लागतात.
वाद - सकाळी घरातील लोकांशी किंवा कुणाशीही भांडण किंवा वाद केल्याने आपला मूड आणि दिवस दोन्ही खराब होतात. आपला मूड चांगला नसला तर त्याचा परिणाम आपल्यासोबत राहणार्यावर पडेल, आपल्या कामावर पडेल आणि ताण येईल.
मसालेदार पदार्थ - सकाळचा आहार पौष्टिक असला पाहिजे. मसालेदार, चमचमीत आहाराने पोटात जळजळ होते आणि पचनक्रिया बिघडते. मग दिवसभर अस्वस्थ वाटत राहतं.