'हा' असू शकतो High Blood Pressure चा प्राथमिक संकेत, वेळीच व्हा सावध!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2023 16:22 IST2023-01-19T16:21:23+5:302023-01-19T16:22:09+5:30
High blood pressure : हाय ब्लड प्रेशरच्या प्राथमिक स्थितीतील अनेक लक्षणांपैकी एक लक्षण म्हणजे सेन्सेशन होणे आणि त्यावेळी वेदना होणे. जर अशाप्रकारची समस्या जाणवत असेल तर तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.

'हा' असू शकतो High Blood Pressure चा प्राथमिक संकेत, वेळीच व्हा सावध!
High blood pressure : हाय ब्लड प्रेशर फार कॉमन समस्या आहे, पण जास्तीत जास्त लोकांसाठी ही समस्या फार त्रासदायक ठरत आहे. सर्वात धोकादायक बाब ही आहे की, जोपर्यंत लोक पूर्णपणे या समस्येच्या जाळ्यात अडकत नाहीत, तोपर्यंत त्यांना काही माहितही होत नाही. हाय ब्लड प्रेशरच्या प्राथमिक स्थितीतील अनेक लक्षणांपैकी एक लक्षण म्हणजे सेन्सेशन होणे आणि त्यावेळी वेदना होणे. जर अशाप्रकारची समस्या जाणवत असेल तर तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
हाय ब्लड प्रेशर त्या समस्येला मानलं जातं, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आर्टरीजमध्ये ब्लडचंप्रेशर सामान्यापेक्षा अधिक राहतं. एक्सपर्टनुसार, यूकेमध्ये दररोज ४ पैकी १ व्यक्ती हाय ब्लड प्रेशरने पीडित आहे. पण लोकांना या आजाराची प्राथमिक काहीच लक्षणे दिसून येत नाहीत. त्यामुळे समस्या अधिक वाढते. पण हा आजार सुरूवातीच्या काळातच ओळखण्यासाठी किंवा याची माहिती घेण्यासाठी सर्वात चांगला पर्याय म्हणजे रोज तुमचा बीपी चेक करत रहावा.
बीपी चेक करण्यासाठी तुम्ही तुमच्या जवळच्या डॉक्टरला भेटू शकता किंवा घरीच बीपी चेक करण्याचं उपकरण ठेवू शकता. पण अचानक डोकं दुखणे आणि त्यामुळे वेदना होणे हा सुद्धा हाय ब्लड प्रेशरचा प्राथमिक संकेत असू शकतो. जर डोकं अचानक जोरात दुखत असेल आणि सेन्सेशन किंवा शरीराच्या एखाद्या भागात वेदना होत असेल तर तुम्ही वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. सुरूवातीलाच या आजाराचा धोका ओळखून तुम्ही हा आजार अधिक गंभीर रूप घेण्याआधी रोखू शकता.