दिवाळीत तेलकट अन् गोड खाल्यानं वजन वाढलंय?; बॉडी डिटॉक्स करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

By manali.bagul | Published: November 20, 2020 01:14 PM2020-11-20T13:14:07+5:302020-11-20T13:32:29+5:30

Health Tips of weight loss in marathi : वजन वाढणं, जास्त तेलयुक्त पदार्थांमुळे छातीत कफ जमा होणं,  खोकला, चरबी वाढणं अशा समस्या उद्भवतात.

Health Tips : Post diwali detox your body with these drink | दिवाळीत तेलकट अन् गोड खाल्यानं वजन वाढलंय?; बॉडी डिटॉक्स करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

दिवाळीत तेलकट अन् गोड खाल्यानं वजन वाढलंय?; बॉडी डिटॉक्स करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय

Next

दिवाळीचा सण हा वर्षातून एकदाच येतो. त्यामुळे तुम्ही कितीही डाएट करायचं म्हटलं तरी जीभेवर आणि मनावर नियंत्रण ठेवता येतं नाही. काहीजणांनी नुकतंच डाएट सुरू केलेलं असतं, काहीजणांचे अनेक महिन्यापासून सुरू असते,  तर काहीजण वजन कमी करण्यासाठी कमी खाण्याच्या किंवा डाएट करण्याच्या विचारात असतात.  पण दिवाळीचा फराळ संपेपर्यंत काही डाएट फॉलो केलं जात नाही.  त्यामुळे वजन वाढणं, जास्त तेलयुक्त पदार्थांमुळे छातीत कफ जमा होणं,  खोकला, चरबी वाढणं अशा समस्या उद्भवतात. आज आम्ही तुम्हाला दिवाळीचा फराळ खाऊन वजन वाढलं असेल तर कोणत्या उपायांनी वजन नियंत्रणात ठेवायचं याबाबत सांगणार आहोत. 

वजन कमी करायचं असेल तर शरीरातलं प्रोटिन वाढवण्याची गरज असते. तुमच्या जेवणामध्ये अंडी, चिकन, डाळी, फळांचा समावेश करा. हे पदार्थ खाल्ल्यामुळे भूक नियंत्रणामध्ये येते आणि कॅलरीज् कमी होण्यासही मदत होते. या पदार्थांचा आहारात समावेश केल्यामुळे वजम कमी होण्यास मदत होते. याशिवाय अनेक रसांचा आहारात समावेश करून तुम्ही शरीर डिटॉक्स करू शकता. 

आवळ्याचा रस

आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी आपल्या शरीरातील पांढऱ्या रक्त पेशींना बूस्ट करण्याचे कार्य करते. आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती पांढऱ्या रक्त पेशींवरच अवलंबून असते. यामुळे शरीरामध्ये या पेशी पुरेशा प्रमाणात असणे आवश्यक आहे. छोट्या असलेल्या या फळामुळे शरीर शुद्ध (Detox) होऊन रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते. आवळ्यातील पोषकतत्त्वांमुळे शरीरातील विषारी पदार्थ सहजरित्या बाहेर फेकले जातात. 

आयुर्वेदात आवळ्याचे अनेक उपयोग सांगितले आहेत. पित्तशामक, केशवर्धक, शक्तीवर्धक, निरोगी त्वचेसाठी आणि आता डायबेटिस, कॅन्सरसाठीही आवळ्याचे सेवन केले जाते. आवळ्यामध्ये असणारी औषधी गुणधर्म बीटा ब्लॉकरच्या प्रभावाला कमी करतात. यामुळे तुमचे हृदय निरोगी राहते. तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे कामही आवळा करतो.

काकडीचा रस

काकडीचा रस, लिंबाचा रस, साखर यांचं मिश्रण घेऊन थंड करून ते प्यावं. उन्हात येणाऱ्या घामामुळे शरीरातील क्षारांची संख्या कमी होते. म्हणून काकडीचा ज्यूस हा नेहमीच उपयोगाचा असतो. त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते. जर तुम्हाला  रस बनवण्याचे कष्ट नको असतील तर तुम्ही काकडी धुऊन त्याचे काप करून खाऊ शकता. या फोडींना मीठ व मिरी पावडर लावल्यास त्या चवदार-चविष्ट होतील. शरीरातील विषारी घटक निघून जाण्यासाठी तसंच अन्न पचन होण्यासाठी काकडीचा रस फायदेशीर ठरतो.

इम्यूनिटी वाढवण्यासाठी रोज 'या' ३ गोष्टी वापरत असाल; तर वेळीच सावध व्हा

दालचीनी आणि मध

शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यासाठी एक कप उकळलेल्या पाण्यात दालचीनी आणि मध घाला. २० मिनिटं असंच राहू द्या. त्यानंतर  गॅस बंद करा. सकाळच्या नाष्त्याच्या अर्धा तास आधी या चहाचे सेवन करा. या डिटॉक्स ड्रिंकमुळे तुम्हाला ताजतवान झाल्याप्रमाणे वाटेल.

व्यायाम करतेवेळी मास्क वापरल्याने फुफ्फुसांवर 'असा' होतो परिणाम; तज्ज्ञांचा खुलासा

बीटाचा रस

बीट हा लोह आणि व्हिटामीन्सचा खनिजा आहे. बीटरूट शरीरातील हिमोग्लोबिन वाढवतात आणि रक्त शुद्ध करतात. त्यासाठी  १०० मिली बीटाचा रस घ्या. त्यात २५ मिली गाजराचा रस आणि २५ मिली टोमॅटोचा रस मिसळा. त्यात १/2 चमचे लिंबाचा रस घाला व चवीनुसार काळे मिठ देखील व्यवस्थित घालावे. दररोज हे एकदा पिणे आवश्यक आहे. यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते. 

(टिप : वरील सर्व उपाय आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

Web Title: Health Tips : Post diwali detox your body with these drink

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.