वनस्पती तूपातल्या जेवणामुळे होऊ शकतात हे गंभीर आजार; शरीर कधी पोकळ होईल कळणारही नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 12:08 PM2021-02-11T12:08:19+5:302021-02-11T12:21:58+5:30

Health Tips in Marathi : वनस्पती तूपाचा प्रमाणाबाहेर आहारात समावेश करणे हृदयासाठीच धोकादायक ठरत नाही तर मधुमेहाचा धोका देखील वाढवू शकतो.

Health Tips in Marathi : Health harmful effects of vanaspati ghee dalda for health | वनस्पती तूपातल्या जेवणामुळे होऊ शकतात हे गंभीर आजार; शरीर कधी पोकळ होईल कळणारही नाही

वनस्पती तूपातल्या जेवणामुळे होऊ शकतात हे गंभीर आजार; शरीर कधी पोकळ होईल कळणारही नाही

googlenewsNext

असं नाही की आपल्या शरीराला ट्रान्स फॅट एसिडची आवश्यकता नसते. पण वनस्पती तुपामध्ये (vanaspati ghee)  त्याचे प्रमाण 60 टक्क्यांपेक्षा जास्त आहे जे मांसापेक्षा खूप जास्त आहे. त्याच वेळी, डेअरी उत्पादनांमध्ये ट्रान्स फॅट अॅसिडचे प्रमाण केवळ 2 ते 5 टक्के असते. अशा परिस्थितीत, त्याचा प्रमाणाबाहेर आहारात समावेश करणे केवळ आपल्या हृदयासाठीच धोकादायक ठरत नाही तर मधुमेहाचा धोका देखील वाढवू शकतो. आज आम्ही तुम्हाला वनस्पती तुपामुळे कोणत्या प्रकारच्या नुकसानाचा सामना करावा लागतो. याबाबत अधिक माहिती देणार आहोत. 

हृदयााला नुकसान पोहोचतं

जर आपण जास्त प्रमाणात ट्रान्स फॅट अॅसिड असलेले पदार्थ खाल्ले तर याचा थेट परिणाम आपल्या हृदयावर होतो. त्याचे कारण आपल्या शरीरात खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते आणि चांगले कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. तज्ञांच्या मते, जर अन्नातील प्रमाणातील ट्रान्स फॅट ४ टक्के असेल तर तेही बरेच आहे.  ताज्या अभ्यासातून असे दिसून येते की भारतात वापरल्या जात असलेल्या वनस्पती तेलांमध्ये ट्रान्स फॅट अॅसिड ४० ते ५० टक्के असतात.

ब्रेस्ट कॅन्सरचा धोका वाढतो

फॅटी एसिडस् (एसएफए) आपल्या शरीरासाठी हानिकारक मानले जातात. कारण एकूण एलडीएल वाढते. त्याच वेळी, जर आपण कमी एसएफए असलेल्या खाद्यपदार्थाविषयी चर्चा केली तर ते अधिक हानिकारक नाहीत, जसे की नारळ तेल. , नारळ तेलाचा सेरम लिपिडवर परिणाम होत नाही. वनस्पतींमधील जास्त ट्रान्स फॅटी एसिडस् सीरम लिपिडचे नुकसान करू शकतात. हे थेट हृदयावर आक्रमण करते आणि स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सर एक मुख्य कारण देखील आहे.

गर्भातील बाळाच्या डोळ्यांना नुकसान

वनस्पती तेलानं गर्भाच्या डोळ्यांनाही नुकसान होऊ शकते. शरीरात पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड आहे असतात जे गर्भाशयात वाढणार्‍या बाळाच्या डोळ्यांचा विकास करतो. परंतु ट्रान्स फॅटी अॅसिडच्या अति-वापरामुळे पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडस् प्रतिबंधित करते. ज्यामुळे बाळाला डोळ्याची समस्या उद्भवू शकते.

लठ्ठपणा वाढतो

जर तुम्ही  जास्त प्रमाणात ट्रांन्स फॅट्स युक्त पदार्थांचे सेवन करत असाल तर  तुमचं वजन वाढून लठ्ठपणाचा सामना करावा लागू शकतो. ट्रांस फॅटी एसिड्स औद्योगिक स्वरूपात उत्पादित होतात. हे तयार करण्यासाठी पशू किंवा वनस्पतींचा वापर केला जातो. त्यामुळे त्यात जास्त प्रमाणात कॅलरीज असतात. ज्यामुळे वजन जास्त वाढण्याचा धोका उद्भवू शकतो.

डायबिटीसचा धोका वाढतो

ट्रांस फॅटी अॅसिड् जास्त प्रमाणात शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे इंसुलिनच्या प्रमाणावर परिणाम होते.  यामुळेडायबिटीस होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर, थोड्या प्रमाणात ट्रान्स फॅट घेतल्यानंतरही इन्सुलिनचा तीव्र परिणाम होतो आणि यामुळेही डायबिटीसचा धोका देखील वाढतो. म्हणूनच, मर्यादित प्रमाणात ट्रान्स फॅट देखील शरीराला आवश्यक आहे. 

चिंताजनक! महाराष्ट्रातील 'या' 3 शहरात वाढतोय कोरोनाचा धोका; अधिक सावध राहावं लागणार

एलर्जी

ट्रान्स फॅट्सचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास एलर्जीची समस्या देखील उद्भवू शकते. यात दमा, सर्दी आणि इतर समस्या समाविष्ट आहेत. एका अलीकडील अभ्यासानुसार 13 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये ट्रान्स फॅटची एलर्जी जास्त आढळते. या व्यतिरिक्त हा अभ्यास असे सुचवितो की अशा जोडणीचे मोनोसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिडसारखेच नसते.

सकाळी उठल्या उठल्या पोट साफ होत नाही? मग गॅस, पोटदुखीची चिंता सोडा, या उपायांनी समस्या होईल दूर

सूज येणं

अशा बर्‍याच अभ्यासांमधून असे दिसून आले आहे की ट्रान्स फॅटचे जास्त प्रमाणात सेवन केल्यामुळे शरीरात दाहक साइटोकिन्स वाढतात. यासह, ज्या लोकांच्या पोटाच्या भागात चरबी असते त्यांना देखील मधुमेह, एडेमा, ऑटोम्यून आणि ट्रान्स फॅटमुळे जळजळ होण्याची समस्या उद्भवते.

(टिप : वरील सर्व दुष्परिणाम आम्ही माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. आम्ही यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक असतं.)

Web Title: Health Tips in Marathi : Health harmful effects of vanaspati ghee dalda for health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.