शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

वयाची तीशी पार केल्यानंतर करायलाच हव्यात 'या' ८ चाचण्या; तरच जीवघेण्या आजारांपासून राहाल लांब

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2021 16:18 IST

वर्षातून एकदा आपल्या शरीराची तपासणी करणे आवश्यक आहे. कारण वय जसजसे वाढत जाते तसतसे आपले शरीर देखील म्हातारे होते आणि पूर्वीचे कार्य कमी करते.

आपण कधीही आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये, विशेषत: जेव्हा आपण वयाची तीशी पार करता.  कोणत्याही रोगाचे वेळेवर निदान केल्यास ताबडतोब उपचार करता येतात. परंतु आपल्यापैकी बरेच लोक आहेत जे वर्षातून कधीच डॉक्टरकडे जात नाहीत. वर्षातून एकदा आपल्या शरीराची तपासणी करणे आवश्यक आहे. कारण वय जसजसे वाढत जाते तसतसे आपले शरीर देखील म्हातारे होते आणि पूर्वीचे कार्य कमी करते. आज आम्ही आपल्याला काही महत्त्वपूर्ण वैद्यकीय चाचण्यांबद्दल सांगणार आहोत, ज्या प्रत्येकाने 30 वर्षानंतर करायलाच हव्यात. जेणेकरून तुम्ही आरोग्याची काळजी घेऊ शकता. 

कम्‍पलीट ब्‍लड काउंट (CBC)

अशक्तपणा, संसर्ग, कर्करोग अशा काही प्रकाराच्या आजारांबाबत माहिती मिळवण्यासाठी या चाचणीसाठी उपयोग होतो. हे विशेषतः भारतीय महिलांसाठी महत्वाचे आहे. कारण आपल्यातील बहुतेक लोक अशक्तपणा, अनिमियामुळे पीडित आहेत. सीबीसी ठीक असल्यास वर्षातून एकदा त्याची पुनरावृत्ती होऊ शकते.

ब्लड शुगर टेस्ट

ही चाचणी १२ तास उपाशी राहिल्यानंतर डायबिटीसबाबत माहिती मिळवण्यासाठी केली जाते. जर रीडिंग <99 असेल तर सामान्य स्थिती असते. १०० किंवा ११० रिडिंग असते तेव्हा प्री डायबिटीसचे संकेत असतात. ११० पेक्षा जास्त असल्यास मधुमेहाची समस्या जाणवू शकते. 

पॅम स्मिअर 

ही चाचणी आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी केली जाते, जी अचूक सूचक मानली जाते. हे रक्त तपासणी, एकूण कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसरायड्स, एचडीएल आणि एलडीएल पातळी मोजण्यासाठी वापरले जाते. जर आपण लठ्ठपणाच्या श्रेणीमध्ये येत असाल किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्यास हृदयविकाराचा किंवा डायबिटीस असेल तर आपण वर्षातून एकदा ही चाचणी करून घ्यावी.

ईसीजी

वयाच्या 35 व्या वर्षानंतर ही चाचणी करून घेण्यास सूचविले जाते. हे विशेषत: हृदयातील रक्तवाहिन्यांची लक्षणे, अडथळा, ऑक्सिजनची कमतरता, छातीत तीव्र वेदना, दम लागणे किंवा हृदयविकाराचा झटका ही लक्षणं शोधण्यासाठी ईसीजी चाचणी केली जाते.

लिव्हर इंन्फेक्शन

लिव्हरची स्थिती तपासण्यासाठी ही वार्षिक चाचणी आहे. जर अल्कोहोलचे सेवन  जास्त प्रमाणात करत असाल किंवा आपल्याला फॅटी लिव्हर, हिपॅटायटीस सी आणि बी सारखा आजार असू शकतो म्हणून वेळीच ही चाचणी करून घ्या.

थायरॉइड फंक्शन टेस्ट

अंडेरेक्टिव्ह (हायपोथायरॉईडीझम) किंवा ओव्हरएक्टिव थायरॉईड (हायपरथायरॉईडीझम) शोधण्यात या रक्त चाचण्या महत्त्वपूर्ण आहेत. आपली थायरॉईड ग्रंथी योग्य प्रकारे कार्य करत आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो. यासाठी टी 3, टी आरयू, टी 4, टीएसएच चाचणी करण्यास सांगितले जाते. मृत्यूचं कारण ठरू शकतं नाकातील केस कापणं; तुम्हीसुद्धा असंच करत असाल तर वेळीच सावध व्हा

व्हिटामीन डी च्या कमतरतेची चाचणी

व्हिटॅमिन डी च्या अभावामुळे आपल्या हाडांना आणखी नुकसान होऊ शकते. यामुळे आपल्याला ऑस्टिओपोरोसिसचा धोका देखील वाढवू शकता. जर रिडींग 30 पेक्षा जास्त असेल तर याचा अर्थ असा आहे की आपल्यामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता आहे.चिंताजनक! लसीकरणाला सुरूवात होताच कोरोना लसीबाबत चीनी वैज्ञानिकांचा खुलासा

(टिप : वरील सर्व गोष्टी या केवळ माहीती म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. )

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य