तुम्हीसुद्धा टीव्ही, मोबाईल सुरु ठेवून झोपता का? 'या' आजाराला बळी पडण्याआधी सावध व्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2020 03:20 PM2020-07-05T15:20:43+5:302020-07-05T15:45:42+5:30

महिलांना लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागत होता. ही सवय असल्यामुळे महिलांमध्ये वजन वाढण्याचा धोका सर्वाधिक जाणवतो.

Health Tips : know why you should not sleep with your tv on | तुम्हीसुद्धा टीव्ही, मोबाईल सुरु ठेवून झोपता का? 'या' आजाराला बळी पडण्याआधी सावध व्हा

तुम्हीसुद्धा टीव्ही, मोबाईल सुरु ठेवून झोपता का? 'या' आजाराला बळी पडण्याआधी सावध व्हा

Next

(image credit- Horvard health)

लाईट सुरू ठेवून झोपण्याची सवय अनेकांना असते. डोळ्यांवर उजेड येऊ नये म्हणून काहीजण रात्री लाईट सुरू ठेवून चादर घेऊन झोपतात.  खूप लोक टीव्ही सुरू असतानाच झोपतात. जर तुम्ही सुद्धा टीव्ही सुरू ठेवून झोपत असाल या सवयीमुळे तुमच्या आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. आम्ही तुम्हाला टीव्ही किंवा मोबाईल सुरू ठेवून झोपण्याच्या दुष्परिणामांबाबत सांगणार आहोत. 

नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थने दिलेल्या माहितीनुसार  रात्री टीव्ही सुरू ठेवून झोपल्याने महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे कमरेचे त्रास उद्भवू शकतात. तज्ज्ञांनी दिलेल्या अमेरिकेतील ३५ ते ७४ वर्ष वयोगटातील महिलांकडून मिळालेल्या माहितीचे विश्लेषण केले होते. या महिलांना  ब्रेस्ट कॅन्सरसारख्या इतर आजारांचा सामना करावा लागला होता. या महिलांना रात्री टिव्ही सुरू ठेवून झोपण्याची सवय होती. 

ज्या महिलांना टिव्ही पाहता पाहता झोपण्याची सवय होती. अशा महिलांना लठ्ठपणाच्या समस्येचा सामना करावा लागत होता. ही सवय असल्यामुळे महिलांमध्ये वजन वाढण्याचा धोका सर्वाधिक जाणवतो. हे संशोधन जामा इंटरनॅशनल मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. या अभ्यासातून तज्ज्ञांनी सांगितले की टीव्ही सुरू ठेवून झोपल्याने झोपेशी निगडीत असलेलं स्लीप हार्मोन मॅलिटोनिन प्रभावित होतो. 

कारण जेव्हा आपण टीव्ही पाहत असतो तेव्हा त्यातून बाहेर येणारा कृत्रिम प्रकाश आरोग्यासाठी घातक ठरतो. या अभ्यासादरम्यान वाढत्या वयासोबतच शारीरिक स्थिती, मानसिक स्थिती, आहार घेण्याच्या पद्धतीचा समावेश करण्यात आला होता. या संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार झोप, आरोग्य, वजन यांवर कृत्रिम प्रकाशाचा परिणाम होत असतो. म्हणूनच मोबाईल किंवा टीव्ही, लॅपटॉप सुरू ठेवून झोपणं घातक ठरू शकतं. डोळ्यांच्या अनेक समस्या यामुळेच उद्भवतात.  

धक्कादायक! चीनमध्ये 'असा' झाला कोरोनाचा प्रसार; WHO च्या पडताळणीआधीच खुलासा

जगभरातील 'या' १० मोठ्या कंपन्यामध्ये तयार होतेय कोरोनाची लस, जाणून घ्या कधीपर्यंत येणार

Web Title: Health Tips : know why you should not sleep with your tv on

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.