हार्ट अटॅक टाळायचा असेल तर दिवसातून किती करावं मिठाचं सेवन? जाणून घ्या गाइडलाईन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 14:14 IST2022-01-04T14:14:18+5:302022-01-04T14:14:27+5:30
How much salt to eat daily: मिठाने जेवण टेस्टी तर होतंच सोबतच आपल्या शरीराला पोषणही मिळतं. पण मिठाचं जास्त सेवन केलं तर तुम्हाला हार्ट अटॅकही येऊ शकतो.

हार्ट अटॅक टाळायचा असेल तर दिवसातून किती करावं मिठाचं सेवन? जाणून घ्या गाइडलाईन्स
How much salt to eat daily: मिठाई सोडून घरात कोणताही पदार्थ तयार केला आणि त्यात जर मीठ नसेल तर त्या पदार्थाला काही चवच येत नाही. मिठाशिवाय पदार्थाला चव येत नाही. मिठाने जेवण टेस्टी तर होतंच सोबतच आपल्या शरीराला पोषणही मिळतं. पण मिठाचं जास्त (Salt) सेवन केलं तर तुम्हाला हार्ट अटॅकही (Heart Attack) येऊ शकतो.
मिठाचं किती सेवन योग्य?
अनेकांना प्रश्न पडतो की, एका दिवसात मिठाचं किती सेवन करावं. WHO नुसार, एका निरोगी-फीट व्यक्तीने रोज जास्तीत जास्त ५ ग्रॅम मिठाचं सेवन करावं. म्हणजे हे वेगवेगळ्या पदार्थातील प्रमाण आहे. जर तुम्ही यापेक्षा जास्त मिठाचं सेवन केलं तर तुम्ही हार्ट अटॅक आणि हाय ब्लड प्रेशरला निमंत्रण देत आहात.
शरीराला सोडिअम-पोटॅशिअमची गरज
WHO नुसार, एका व्यक्तीला फीट राहण्यासाठी सोडिअम आणि पोटॅशिअम दोन्हींची गरज असते. जर व्यक्ती रोज ५ ग्रॅमपर्यंत मीठ खात असेल तर दोन्ही गोष्टी त्यांना योग्य प्रमाणात मिळतात. तेच जास्त मीठ खाल्ल्याने शरीरात सोडिअमचं जास्त प्रमाण होतं. ज्याने हाडं कमजोर होऊ लागता आणि हाय ब्लड प्रेशरची समस्या होऊ लागते. हाय बीपी समस्या झाल्याने हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोका वाढतो.
दरवर्षी ३० लाख लोकांचा मृत्यू
WHO च्या रिसर्च रिपोर्टनुसार, जास्त मीठ खाल्ल्याने दरवर्षी साधारण ३० लाख लोकांचा मृत्यू होतो. याचं कारण हे आहे की, जगात जास्तीत जास्त लोक रोज ९ ते १२ ग्रॅम मिठाचं सेवन करतात. जे गरजेपेक्षा दुप्पट आहे. जर तुम्ही मिठाचं सेवन कमी केलं तर साधारण २५ लाख लोकांचा जीव वाचू शकतो.
मिठाचं सेवन कमी कसं कराल?
- जेवण तयार करताना कमी मीठ टाका
- जेवणाच्या टेबलवर मिठाची डबी किंवा मीठ ठेवू नका
- चिप्ससारखे जास्त मीठ असणारे पदार्थ कमी खा.
- कमी सोडिअम असलेले पदार्थ खरेदी करा.
वाढत आहे हाय बीपीची समस्या
मेडिकल एक्सपर्टनुसार, मीठ दोन तत्वांपासून तयार होतं. यात सोडिअम आणि पोटॅशिअम हे दोन मुख्य तत्व असतात. सामान्यपणे जे मीठ आपण खातो, त्यात सोडिअमचं प्रमाण जास्त असतं आणि पोटॅशिअमचं प्रमाण कमी असतं. अशात जास्त प्रमाणात सोडिअमचं सेवन करणारे लोक ब्लड प्रेशरचे जास्त शिकार होत आहे. अशा लोकांना हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचा धोकाही जास्त असतो.