किडनी डॅमेज करू शकतो HMPV व्हायरस; नव्या रिसर्चमध्ये धडकी भरवणारा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 11:43 IST2025-01-14T11:42:22+5:302025-01-14T11:43:20+5:30
HMPV Virus : ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) चे अनेक रुग्ण आढळले आहेत. सरकार आणि आरोग्य विभाग याबाबत सतर्क आहेत.

किडनी डॅमेज करू शकतो HMPV व्हायरस; नव्या रिसर्चमध्ये धडकी भरवणारा खुलासा
भारतात आतापर्यंत ह्युमन मेटान्यूमोव्हायरस (HMPV) चे अनेक रुग्ण आढळले आहेत. सरकार आणि आरोग्य विभाग याबाबत सतर्क आहेत. हा एक व्हायरस आहे जो श्वासावर हल्ला करतो. त्याची बहुतेक लक्षणं कोरोनासारखीच आहेत. ते कोरोनाइतकं धोकादायक नाही. एचएमपीव्ही व्हायरसची लागण झाल्यानंतर, लोकांना ताप, डोकेदुखी, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होतो. काही लोक म्हणतात की, या व्हायरसमुळे किडनी देखील खराब होऊ शकते. अशा परिस्थितीत, डॉक्टरांकडून संपूर्ण सत्य जाणून घेऊया...
HMPV चा किडनीवर होतो परिणाम
आरोग्य तज्ञांचं म्हणणं आहे की, HMPV चा किडनीवर कोणताही थेट नकारात्मक परिणाम दिसून आलेला नाही, परंतु याचे काही अप्रत्यक्ष पुरावे निश्चितच आढळले आहेत. काही प्रकरणांमध्ये रुग्णाला डायलिसिसची आवश्यकता असते. या स्थितीत किडनीवर परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की, हा व्हायरस किडनीला नुकसान पोहोचवू शकतो. एका संशोधनात एचएमपीव्ही आणि किडनीच्या समस्यांमधील संबंध देखील आढळून आला आहे.
अमेरिकेत रुग्णालयात दाखल असलेल्या मुलांवर एक अभ्यास करण्यात आला. ज्यामध्ये असं आढळून आलं की, एचएमपीव्ही संसर्गामुळे किडनीची समस्या AKI लक्षणीयरीत्या वाढली आहे. त्याच अभ्यासात असे पुरावे आढळले आहेत की, एचएमपीव्हीचा किडनीच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. याचे ठोस पुरावे देण्यासाठी अधिक अभ्यास आवश्यक आहेत.
शरीराचं मोठं नुकसान
एचएमपीव्ही संसर्गामुळे श्वसनाचे गंभीर आजार होऊ शकतात. या संसर्गामुळे हायपोक्सियाचा धोका वाढू शकतो. यामध्ये, शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊ लागते, ज्यामुळे किडनी योग्यरित्या कार्य करू शकत नाही आणि शरीराचं नुकसान होऊ शकतं. याशिवाय, जास्त ताप आणि उलट्या यासारख्या समस्यांचाही किडनीवर परिणाम होऊ शकतो.
डॉक्टरकडे कधी जायचं?
- पाय सुजणे
- चेहऱ्यावर सूज येणे
- थकवा आणि अशक्तपणा जाणवणे.
- तीव्र पोटदुखी