Health Tips : Foods that weaken your immune system decrease the immunity | Health Tips : 'या' पदार्थांमुळे कमी होतेय इम्यूनिटी; विषाणूंचा संसर्ग टाळायचा असेल तर वेळीच सावध व्हा

Health Tips : 'या' पदार्थांमुळे कमी होतेय इम्यूनिटी; विषाणूंचा संसर्ग टाळायचा असेल तर वेळीच सावध व्हा

जगभरात कोरोना संक्रमित रुग्णांच्या आकडेवारी झपाट्यानं वाढ होताना पाहायला मिळत आहे. भारतात कोरोना व्हायरसच्या दुसर्या लाटेनं धुमाकुळ केलेला पाहायला मिळत आहे. अशा स्थितीत पीडित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार ज्या लोकांची  रोगप्रतिकारकशक्ती कमजोर असते. असे लोक कोरोना व्हायरसच्या जाळ्यात अडकत आहेत. 

कोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत ज्यांचा मृत्यू झाला. त्यांची रोगप्रतिराकशक्ती कमी झाल्याचं दिसून आलं आहे. रोगप्रतिकारकशक्ती वाढणं किंवा कमी होणं व्यक्तीच्या खाण्यापिण्यावर अवलंबून असतं. रोगप्रतिकारकशक्ती कमी होण्याचा तुमचा आहार कारणीभूत ठरतो. आज आम्ही तुम्हाला कोणत्या पदार्थांच्या सेवनानं रोगप्रतिराकशक्ती कमी होते याबाबत सांगणार आहोत. 

1) मद्यपान किंव धुम्रपान केल्यानं रोगप्रतिराकशक्ती कमी होते. त्यामुळे दारू किंवा सिगारेट अशा मादक पदार्थांपासून लांब राहण्याच प्रयत्न करा.

2) जास्तीत जास्त फास्ट फूड तयार करण्यासाठी साखरेचा वापर केला जातो. यात फायबर्सचे प्रमाण जास्त असते. फास्टफूडमुळे रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊ लागते. 

3) काही लोकांना चहा , कॉफी जास्त प्रमाणात प्यायला आवडतं.  पण त्यांना याची कल्पना नसते की कॅफेन जास्त प्रमाणात शरीरात गेल्यास रोगप्रतिकारकशक्तीवर परिणाम होतो. 

4) बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नका.  कच्च्या भाज्या खाणं शक्यतो टाळा. फळांचे सेवन करण्याआधी स्वच्छ धुवून मगच खा. पचनक्रियेसाठी घातक असलेल्या पदार्थांचे सेवन करू नका. त्यामुळे  नकळतपणे रोगप्रतिकारकशक्ती कमी होण्याचा धोका असतो. 

जास्त घाम येणं ठरू शकतं हार्ट अटॅकचं कारण; जाणून घ्या लक्षणं अन् वेळीच व्हा सावध! 

5) सकाळी उठल्यानंतर दोन ग्लास पाणी प्या. जेवायच्या अर्धा तास आधी पाणी प्या. त्यामुळे जेवण पचण्यास मदत होईल. जेवल्यानेतर अर्धा तासाने पाणी प्या. व्यायाम करायच्या आधी आणि नंतर भरपूर पाणी प्या. त्यामुळे डिडहायड्रेशनची समस्या उद्भवणार नाही. आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आणि ताजंतवानं राहण्यासाठी दररोज योग्य प्रमाणात पाणी पिणे गरजेचं आहे.

समोर आला कोरोनाचा 'भारतीय स्ट्रेन'; महाराष्ट्रासाठी ठरतोय घातक; धोक्याचा इशारा देत तज्ज्ञ म्हणाले....

योग्य प्रमाणात पाणी पिल्याने तुम्हाला विचार करण्यासाठी, लक्ष केंद्रीत करण्यासाठी आणि तरतरीत राहण्यासाठी मदत मिळते. त्यासोबतच योग्य प्रमाणात पाणी पिल्याने तुमच्या ऊर्जेतही वाढ होत राहाते. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने घाम आणि लघवीच्या माध्यामातून शरीरातील टॉक्सीन बाहेर पडतं

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Health Tips : Foods that weaken your immune system decrease the immunity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.