Health Tips : सध्याच्या धावपळीच्या जगात आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहणं गरजेचं असतं. यासाठी काही लोक सकाळी लवकर उठून मॉर्निंग वॉक करतात. शरीर फिट ठेवण्यासाठी ते रनिंगचा ही आधार घेतात.
धावल्याने केवळ शरीराचं वजनच कमी होत नाही तर आपलं आरोग्य देखील सदृढ राहण्यास मदत मिळते. त्यामुळे माणसाच्या शारीरिक स्वास्थाबरोबरच मानसिक स्वास्थ्य सुद्धा उत्तम राहतं. पण धावताना नेमकी कोणत्या गोष्टींची काळजी घेण गरजेचं असतं, त्यासाठी योग्य पद्धत कोणती हे आपण यानिमित्ताने जाणून घेणार आहोत...
चुकीचे शूज वापरणं-
बऱ्याचदा अनेकजण धावताना म्हणजेच रनिंग करताना चुकीचे शूज वापरतात. चुकीच्या पद्धतीचे शूज वापरल्याने पायांना इजा होऊ शकते. कालांतराने हे शूज बदलणं देखील गरजेचं आहे.
जास्त धावणं-
जर तुम्ही धावताना अचानक वेग वाढवत असाल तर त्यामुळे पायांना तसेच गुडघ्यांमध्ये वेदना होऊ शकतात. त्यामुळे धावताना हळूहळू धावण्याचा वेग वाढवावा.
रनिंग करताना तुमच्या बॉडिचे पोश्चर योग्य स्थितीत असावं. पाय अगदीच मागे घेवून मोठ्या वेगात धावल्यास पायांच्या तळव्यांवर जोर पडतो. त्यामुळे धावता वेळी योग्य पोझिशनमध्ये उभे राहून हळूहळू धावण्याचा वेग वाढवावा.
योग्य आहार महत्वाचा-
अनेकदा व्यायाम केल्यानंतर म्हणजेच धावल्यानंतर भुक कमी लागते. एका संशोधनातून सिद्ध झाले आहे की, मसल्सद्वारे पोषक तत्वांना अब्जॉर्ब करण्याची क्षमता वर्कआउट करण्याच्या ४५ मिनिटांच्या आतमध्ये अधिक असते. त्यामुळे रनिंगनंतर काहीना काही नक्की खा.