​Health : योगासने सुरु करण्यापूर्वी...!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2017 10:03 AM2017-11-23T10:03:35+5:302017-11-23T15:33:35+5:30

बहुतांश सेलेब्स ताणतणाव दूर करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी योगाचा आधार घेतात, विशेष म्हणजे त्यातील काही सेलेब्स स्वत: तर करतातच शिवाय त्यांच्या फॅन्सलाही योगासने करण्याचा सल्ला देतात. त्यानुसार आपण योगासने करु लागतो, मात्र एका अभ्यासानुसार योगासने सुरु करण्यापूर्वी योग्य काळजी घेणे आवश्यक असते.

Health: Before starting yoga ...! | ​Health : योगासने सुरु करण्यापूर्वी...!

​Health : योगासने सुरु करण्यापूर्वी...!

Next
ong>-रवींद्र मोरे 
बहुतांश सेलेब्स ताणतणाव दूर करण्यासाठी आणि फिट राहण्यासाठी योगाचा आधार घेतात, विशेष म्हणजे त्यातील काही सेलेब्स स्वत: तर करतातच शिवाय त्यांच्या फॅन्सलाही योगासने करण्याचा सल्ला देतात. त्यानुसार आपण योगासने करु लागतो, मात्र एका अभ्यासानुसार योगासने सुरु करण्यापूर्वी योग्य काळजी घेणे आवश्यक असते. 

तणाव आणि मानसिक रोग यासारखे आजार दूर करण्यासाठी योगा हा एक उत्तम उपाय आहे. योगामुळे शरीर स्वस्थ राहते आणि त्याबरोबर तणावासंबंधित हॉर्मोनला नियंत्रित करण्यासदेखील मदत करतो, असे आरोग्य तज्ज्ञ म्हणतात.

शिवाय उच्च रक्त दाब, मधुमेह, कोलेस्ट्रॉल आणि लठ्ठपणा यासारख्या समस्येवर योगा हा रामबाण उपाय आहे. योगा हा आयुष्य जगण्याचा एक चांगला मार्ग आहे, असे सांगण्यात येते. रोग झाल्यानंतर त्याच्यापासून सुटका होण्यासाठी लोक अँलोपॅथीची औषधं खावेत की योगा करावा अशा द्विधा मनस्थितीत असतात. पण लोकांना हे समजणे गरजेचे आहे की, मानवाच्या आयुष्यातील प्रत्येक रोगावर योगा हे एक उत्तम औषध आहे. लोकांना ७० टक्यांपेक्षा जास्त रोग हे त्यांच्या बदलत्या जीवनशैलीमुळे होतात. त्यावर एकच उपाय आहे. योगामुळे तुमचे जीवन हे आनंदी आणि सुखी राहिल्यामुळे रोग होण्याचे प्रमाण ३० टक्क्यांनी कमी होते. 

योगाचे हे महत्त्व लक्षात घेऊनच बहुतांशजण योगाभ्यासास सुरुवात करतात. मात्र योगाचा प्रवास सुरू करण्यापूर्वी योग मार्गदर्शकाचा सल्ला व मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे. त्याबरोबरच शारीरिक तपासणी करणे देखील आवश्यक आहे. योगाभ्यास सुरू करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरकडून सल्ला घ्या. काही योगक्रिया एखाद्या विशिष्ट आजाराने ग्रस्त असणाऱ्यांसाठी योग्य नसतात. त्यासाठी सुरुवातीलाच तुम्ही शारीरिक तपासणी करणे गरजेचे आहे.

लक्षात ठेवा, तुम्हाला एखाद्या गंभीर आजार असल्यास तो पूर्णपणे बरा झाल्यानंतरच योग क्रिया करणे योग्य ठरेल. कुठलीही योग क्रिया सुरू करण्याआधी हृदयरोगींनी त्यांच्या डॉक्टरांचा आणि योग शिक्षकाचा सल्ला घेणे योग्य ठरेल. सायनस इंफेक्शनने त्रस्त असाल तर सर्वांगासन करू नये. 

रक्तदाबाचा त्रास असेल तर योग करण्याआधी तुमचा रक्तदाब सामान्य स्थितीत असणे गरजेचे आहे. अशा लोकांनी शरीराचा पूर्ण भार डोक्यावर येतो अशी आसने करणे टाळावेत. कारण या आसनांनी रक्ताभिसरण मेंदूच्या दिशेने होते. योगाचा अभ्यास कोणताही आजार बरा होण्यासाठीही करू शकता.

लक्षात घ्या अंगकाठीने कमजोर प्रकृती असणाऱ्यांनी योग सुरू करण्याआधी दोन गोष्टींकडे लक्ष द्यावे. एक म्हणजे डॉक्टरचा सल्ला घ्यावा आणि दुसरे म्हणजे योगाभ्यास सुरुवात करण्यासाठी सुरुवातीला पाच महिने साधीच आसने करावीत. नंतर इतर योगासने सुरू करू शकता.  

Web Title: Health: Before starting yoga ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.