शहरं
Join us  
Trending Stories
1
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
2
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
3
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
4
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
5
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
6
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
7
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
8
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
9
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान
10
तुम्ही घर विकण्याचा प्लॅन करताय? आता भरावा लागेल कमी टॅक्स! प्राप्तीकर विभागाने जाहीर केला फॉर्म्युला!
11
“शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवले जातायत, शक्तिपीठ महामार्ग लोकांच्या विकासासाठी”: नितेश राणे
12
मंडप सजला, वऱ्हाडी जमले, तेवढ्यात पडली धाड, बोहल्यावरून वर पसार, कारण ऐकून वधूला बसला धक्का 
13
गिअरवाली बाईक, ती ही इलेक्ट्रीक...! काय मॅटर हाय...; २५ पैशांचा खर्च फक्त...
14
अवघ्या १० दिवसांपूर्वीच गर्लफ्रेंडशी लग्न, लिवरपूलचा स्टार फुटबॉलपटू जग सोडून गेला; स्पेनमध्ये अपघात...
15
बंदुकीचा धाक दाखवून उचलून नेलं, लग्नही केलं... पाकिस्तानात १५ वर्षीय हिंदू मुलीचे झाले हाल
16
अरविंद केजरीवालांचं पुन्हा एकला चलो! बिहार विधानसभा निवडणुकीसाठी 'आप'ने थोपटले दंड
17
केरळमध्ये अडकलेल्या F-35 लढाऊ विमानाची दुरुस्ती अशक्य, तुकडे करुन ब्रिटनला घेऊन जाणार
18
एक रिपोर्ट आणि अनिल अंबानींच्या कंपनीचे शेअर्स आपटले; करून देत होते मोठा फायदा, आता नुकसान
19
बीडचे पालकमंत्री अजित पवारांच्या पुढाकाराने CIIITचा मार्ग खुला; जागा-निधी देण्याचा निर्णय
20
आज थांबवले नाही तर १०० टक्के उद्या...; मराठी बोलण्यास नकार दिल्यावरुन मारहाण, मीरा-भाईंदरमध्ये व्यापाऱ्यांचा कडकडीत बंद

HEALTH : वजन कमी करण्यासाठी हा आहे खास शाकाहारी डायट प्लॅन !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2017 15:47 IST

या डाएट प्लॅनसह योग्य पद्धतीने केलेल्या व्यायामामुळे तुमचे काही किलो वजन नक्कीच कमी होईल.

बऱ्याचदा आपण वजन कमी करण्याचा खूप प्रयत्न करतो, मात्र कितीही प्रयत्न केले तरी अपेक्षित वजन कमी होत नाही. सेलिब्रिटींचे मात्र तसे नसते. त्यांनी जर ठरविले तर हवे तसे वजन कमी करु शकता आणि अपेक्षित वजन वाढवू शकता. यासाठी त्यांचा डायट प्लॅन परफेक्ट असतो. आपणासही जर खरंच मनापासून वजन कमी व्हावे असे वाटत असेल तर त्यासाठी शाकाहारी डाएट प्लॅन नक्की ट्राय करा. कारण शाकाहारी फूड खाण्यास चविष्ट असतातच पण त्याचसोबत त्यामुळे तुमचे वजन देखील कमी होऊ शकते. या डाएटसह योग्य पद्धतीने केलेल्या व्यायामामुळे तुमचे काही किलो वजन नक्कीच कमी होईल. * वजन कमी करण्यासाठी शाकाहारी डायट करणे का योग्य आहेशाकाहारी लोकांपेक्षा मांसाहार करणाऱ्या लोकांमध्ये लठ्ठपणा व लठ्ठपणातील विकार जसे की मधूमेह, उच्च रक्तदाब, स्ट्रोक, हार्ट अ‍ॅटक, काही प्रकारचे कॅन्सरचा धोका जास्त प्रमाणात असतो. काही शाकाहार घेणाऱ्या लोकांचे अतिवजन असू शकते पण संशोधनानूसार मांसाहार करणाऱ्यापेक्षा हे लोक १८ टक्कांनी बारीक असतात.सर्वसाधारणपणे शाकाहारामध्ये नैसर्गिकरित्या फॅट व कॅलरीज कमी असल्यामुळे वजन नियंत्रित राखणे सोपे जाते. वनस्पतींमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर व कॉम्लेक्स काबोर्हायड्रेट्स असल्यामुळे या आहाराच्या सेवनाने मोठ्या प्रमाणावर कॅलरीज बर्न होतात व मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होते. शाकाहार घेणाऱ्या लोकांचे वजन तर कमी असतेच शिवाय अशा लोकांना कॅन्सर, मधूमेह, ह्रदयविकार व उच्च रक्तदाबाची समस्या देखील कमी होते. चिकन ऐवजी मॉक मीट, बर्गर ऐवजी व्हेजी बर्गर व पनीर व अंड्याऐवजी टोफूचा आहारात समावेश करा. आपल्या आवडत्या भाज्यांमध्ये कमीतकमी क्रीम, लोणी व तूपाचा वापर करावा. नास्त्यासाठी अंडे न खाता ओट्स मध्ये बदाम व सोया दूध व ताजी फळे घालून खा. डिनर तयार करण्यासाठी बीन्स व पालक घालून व्हेजीटेबल पास्ता अथवा चायनीज नूडल्स अथवा थाय व्हेजीटेबल करी बनवा. तुमच्या आहारामध्ये फळे, भाज्या, तृणधान्ये, डाळी व सोयाबीनचा समावेश करा. या चविष्ट पदार्थांमुळे तुम्हाला शाकाहार करणे सोपे जाईल.   * वजन कमी करण्यासाठी कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यालआपल्या आहारात सर्व गोष्टी वनस्पतीजन्य घटकांपासून तयार करण्यात याव्यात. प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे बंद करावे. कांदा व लसूण शिवाय इतर सर्व भाज्या न सोलता खा. शक्य असल्यास सेंदीय पदार्थांचा आहारात समावेश करा. तसेच वजन घटवताना अवेळी लागणाºया भूकेवर मात मिळवण्यासाठी खास डाएट टीप्स जरुर करा. * असा असावा डाएट प्लॅनपहाटे अख्खी फळे (फळांचा रस नाही) खावीत. नाश्त्यामध्ये इडली-सांबर / पराठा-चटणी / भाज्या / पोहे / मुसली व दूध किंवा तृणधान्ये व न सोललेल्या भाज्यांपासून तयार केलेला कोणताही नास्ता. दुपारच्या जेवनात सलाड,पोळी/भात,डाळ,भाजीचा समावेश असावा. स्रॅक्समध्य स्प्राऊट चाट/ फळे असावीत आणि रात्रीच्या जेवनात व्हेजीटेबल सूप, पोळी/भात, डाळ, भाजीचा समावेश असावा.  Also Read : HEALTH : ​झटपट वजन कमी करण्याच्या प्रयत्नात होऊ शकतात ‘हे’ गंभीर परिणाम!                   : ​Fitness : स्लिम आणि फिट राहण्यासाठी करा भरपूर नाश्ता !source : thehealthsite