​Health : सोयाबीनमुळे मिळेल मनासारखी बॉडी, असा करा वापर !

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2017 07:57 AM2017-07-12T07:57:04+5:302017-07-12T13:27:04+5:30

सेलिब्रिटींच्या डायटमध्ये प्रोटीनयुक्त सोयाबीनचा आवर्जून समावेश असतो.

Health: Soyabean will get the body of the body, so use it! | ​Health : सोयाबीनमुळे मिळेल मनासारखी बॉडी, असा करा वापर !

​Health : सोयाबीनमुळे मिळेल मनासारखी बॉडी, असा करा वापर !

Next
लिब्रिटींचे फिट शरीर पाहून कोणालाही त्यांचा हेवा वाटेल. आपल्या फिटनेससाठी प्रत्येक सेलेब्स जिम, योगा बरोबरच आपल्या डायट प्लॅनकडेही विशेष लक्ष देतात. विशेषत: मसल्स बनण्यासाठी शरीराला प्रोटीन्सची आवश्यकता असते. त्यामुळे त्यांच्या डायटमध्ये प्रोटीनयुक्त सोयाबीनचा आवर्जून समावेश असतो.
आपणासही आपल्या मनाप्रमाणे बॉडी हवी असल्यास सोयाबीनचा वापर करु शकता. 

सोयाबीनमध्ये प्रोटीन व्यतिरिक्त खनिज, विटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि विटॅमिन ए आदी पोषक तत्व भरपूर प्रमाणात आढळतात. शिवाय यात कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, आयर्न आणि कॅल्शियमसारखे मिनरल्सदेखील असतात. 
चला जाणून घेऊया सोयाबीन सेवन केल्याने काय फायदे होतात.  

* भरपूर प्रोटीन
सोयाबीनमध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणात असते. यामुळे बॉडी बनविणाऱ्यानी सोयाबीनचे सेवन आवर्जून करावे. सोयाबीनपासून आपण सोया मिल्कदेखील बनवून त्याचे सेवन करू शकता. सोया मिल्कमध्ये प्रोटीनचे प्रमाण भरपूर असते, यामुळे मांसपेशी मजबूत होण्यास मदत होते. शिवाय स्किन सेल्सचे टिशूज मजबूत होतात, ज्यामुळे केस गळती थांबून टक्कल पडत नाही. 

Related image

* ह्रदयविकारावर गुणकारी 
सोयाबीनमध्ये कोलेस्ट्रॉलला कमी करण्याचा गुणधर्म असतो, ज्यामुळे ह्रदयाच्या समस्या दूर होऊन ह्रदय मजबूत होण्यास मदत होते.  

* भरपूर कॅल्शियम आणि आयर्न
सोयाबीनमध्ये कॅल्शियम आणि आयर्नदेखील मोठ्या प्रमाणात असते जे शरीराच्या विकासासाठी खूपच साहायक ठरते. विशेष म्हणजे सोयाबीनच्या सेवनाने त्वचा, नखे आणि केसांचे आरोग्यही उत्तम राहते.  

 * सोयाबीन एक स्वस्त उपाय असून प्रत्येकाच्या बजेटमध्ये फिट बसतो. याशिवाय आपण सोयाबीनची सहज खरेदीही करु शकता.    

Also Read : ​HEALTH : ​पुरुषांनी रोज प्यावे ‘हे’ दूध, पण का?
                   : ​​Health : पुरुषांनी प्यावे खारीकचे दूध, होतील हे १० फायदे!

Web Title: Health: Soyabean will get the body of the body, so use it!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.