Health : ​‘थायरॉइड’ने त्रस्त असाल तर चुकूनही खाऊ नका हे पदार्थ !

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2017 06:32 AM2017-06-09T06:32:48+5:302017-06-09T12:02:48+5:30

थायरॉइडची समस्या असल्यास आहाराचे काही पथ्य सांगण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया की या समस्येदरम्यान कोणत्या खाद्यपदार्थांपासून लांब राहावे.

Health: If you are suffering from thyroid, do not eat it by accident! | Health : ​‘थायरॉइड’ने त्रस्त असाल तर चुकूनही खाऊ नका हे पदार्थ !

Health : ​‘थायरॉइड’ने त्रस्त असाल तर चुकूनही खाऊ नका हे पदार्थ !

Next
वसेंदिवस थायरॉइड समस्येने त्रस्त होणाऱ्याची संख्या वाढतच आहे. विशेष म्हणजे ही समस्या पुरुषांच्या तुलनेने महिलांमध्ये जास्त दिसून येते. थायरॉइडमुळे बहुतांश लोकांचे वजन वाढते आणि ही समस्या अजून बिकट होते. 
थायरॉइडची समस्या असल्यास आहाराचे काही पथ्य सांगण्यात आले आहेत. चला जाणून घेऊया की या समस्येदरम्यान कोणत्या खाद्यपदार्थांपासून लांब राहावे. 


* मद्यपान 
थायरॉइडमध्ये झोप न येण्याची समस्या उद्भवते. झोप येत नाही म्हणून आपण बऱ्याचदा मद्यप्राशन करतो. यामुळे समस्या अजून वाढते. सोबतच मद्यप्राशन केल्याने ओस्टियोपोरोसिसचा धोकादेखील वाढतो. 

Image result for कॉफी
* कॉफी
ही समस्या असल्यास कॉफीचेही सेवन टाळावे. कॉफीतील कॅफीनचा थायरॉइडवर सरळ प्रभाव पडत नाही मात्र थायरॉइडमुळे उद्भवणाऱ्या समस्या वाढतात आणि अस्वस्थता वाढते. 

Related image
* लाल मांस (रेड मीट) 
थायरॉइड झाल्यावर लाल मांस (रेड मीट) अजिबात खाऊ नये. रेड मीटमध्ये कोलेस्ट्रॉल आणि सेचुरेटेड फॅट असते, ज्यामुळे वजन वाढते. शिवाय याच्या सेवनाने रुग्णांना खाजेचा त्रास होऊ शकतो. 

Image result for वनस्पती तूप
* वनस्पती तूप 
वनस्पती तूप चांगल्या कॉलेस्ट्रॉलला नष्ट करुन वाईट कॉलेस्ट्रॉलच्या वाढीस चालना देते, आणि याचा थायरॉइडवर प्रभाव पडतो. 

Image result for आयोडीन
* आयोडीन
हायपोथायरॉइडच्या अवस्थेमध्ये आपण आयोडीनचे सेवन करु नये. शिवाय समुद्र पदार्थ आणि आयोडीनयुक्त मीठाचा वापर कटाक्षाने टाळावे. 

Web Title: Health: If you are suffering from thyroid, do not eat it by accident!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.