अननसाचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहेत का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 17:31 IST2018-07-06T17:30:26+5:302018-07-06T17:31:22+5:30
सध्या पावसाला सुरुवात झाली असून वातावरणात थंडावा पसरला आहे. पावसासोबतच सर्दी, खोकला, पडसे यांसारखे अनेक आजारही येतात. परंतु या आजारांवर अननस हे फार फायदेशीर असे फळ आहे.

अननसाचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहेत का?
सध्या पावसाला सुरुवात झाली असून वातावरणात थंडावा पसरला आहे. पावसासोबतच सर्दी, खोकला, पडसे यांसारखे अनेक आजारही येतात. परंतु या आजारांवर अननस हे फार फायदेशीर असे फळ आहे. अननसामधील पोषक घटकांमुळे पचन संस्थेशी निगडीत रोग आणि हृदयाशी निगडीत आजारांसाठी उपयुक्त ठरते. अननसामध्ये जीवनसत्त्व सी, बी-6, मॅगनीज, फॉस्फरस, ब्रोमेलेल हे घटक मोठ्या प्रमाणात असतात...
1. अननसमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे हिरड्या निरोगी राहण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
2. अननसात असलेल्या ब्रोमेलीन एंजाईममुळे पचनपक्रीया सुधारण्यास मदत होते.
3. अननसमधील विटामीन सी त्वचेसाठीही उपयुक्त ठरते. त्यामुळे इलास्टिसिटी वाढवते आणि सुंदर बनवते.
4. अननस खाल्याने सर्दी खोकला होण्याची शक्यता कमी असते तसेच कफ दूर करण्यासाही ते फायदेशीर ठरते.
5. सांधीवातावर उत्तम उपाय म्हणून अननसाचे सेवन केले जाते.
6. अननसमधील अॅटीऑक्सिडेन्ट कॅन्सरची शक्यता कमी करते आणि शरिरातील सेल्स हेल्दी राहण्यास मदत होते.
7. अननसाच्या ज्यूस प्यायल्याने सायनसचा त्रासही कमी होतो.