शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

मिठाई म्हणूननही खाल्ली जाणारी 'ही' भाजी ठेवते नियंत्रणात शुगर, कॉलेस्ट्रॉल अन् वजनही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 13:16 IST

परवल या भाजीचं नावच कमी जणांनी ऐकलं असेल त्यामुळे या भाजीची चव चांगली असूनही घरी आणली जातेच असं नाही. पण, याची भाजी आणि मिठाईसुद्धा करता येते.

फळं, कडधान्य, भाज्याआरोग्यासाठी अतिशय फायदे आहेत. त्यामुळेच तर, त्यांचा आहारामध्ये समावेश (Included in Diet) असतोच. भाज्या, पालेभाज्या लोक आवडीने खातात. पण, काही भाज्या त्यांच्या चवीमुळे (Taste) खाणं टाळलं जातं. कारलं, वांग, शेपू अशा भाज्या पोटासाठी उत्तम असल्या तरी सर्वांनाचं आवडतात असं नाही. त्यातलीच एक भाजी आहे परवल (Parval). परवल या भाजीचं नावच कमी जणांनी ऐकलं असेल त्यामुळे या भाजीची चव चांगली असूनही घरी आणली जातेच असं नाही. पण, याची भाजी आणि मिठाईसुद्धा करता येते.

परवल आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर (Health Benefits) आहे. याला कोवाक्काई,थोंडाकाई,पोटोल आणि परोरा या नावानेही ओळखलं जातं. आरोग्यासाठी परवल खाण्याचे किती फायदे (Health Benefits Of Parval) आहेत हे जाणून घेऊयात. हे फायदे माहिती झाले तर, आहारात ही भाजी समाविष्ट करालच.

कोलेस्टरॉल नियंत्रित करत

कोलेस्ट्रॉल नियंत्रित (Cholesterol Control) करण्यासाठी परवल मदत करतं. परवलमध्ये हायपरलिपिडेमिक गुणधर्म आहेत ज्यामुळे परवल कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करण्याचं काम करतं. LDL म्हणजे खराब कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड म्हणजेच रक्तातील चरबी कमी करण्याचं काम करतं. तसेच HDL म्हणजे चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवण्यास मदत करत.

रक्त शुद्ध करतंशरीराचं रोगांपासून संरक्ष करण्यासाठी रक्त शुध्दीकरण आवश्यक आहे आणि रक्त शुद्ध करणारे गुण परवलमध्ये असतात. यामुळे रक्त शुद्ध करण्याचं काम करतं. ज्यामुळे आजार होण्याचा धोका कमी होतो.

वजन कमी करण्यासाठीवजन कमी (Weight Loss)करण्यासाठी परवल चांगली भूमिका बजावू शकतं. यात कॅलरीजचं प्रमाण खूप कमी आणि फायबरचे प्रमाण खूप जास्त आहे. यामुळे वजन कमी करण्यासाठी परवल फायदेशीर आहे.

 

 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्सvegetableभाज्या