कॅन्सरपासून वाचवू शकते जगातील ही सगळ्यात महाग भाजी, 1 लाख रूपये किलो असते किंमत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2024 10:36 AM2024-02-03T10:36:01+5:302024-02-03T10:36:43+5:30
आम्ही ज्या भाजीबाबत तुम्हाला सांगत आहोत तिचं वैज्ञानिक नाव 'ह्यूमुलस ल्यूपुलस' आहे. या भाजीला 'हॉप शूट' किंवा 'हॉप कोन्स' नावानेही ओळखलं जातं.
Health benefits of hops: सामान्यपणे भाज्यांची किंमत 50 ते 60 रूपये किलो असते. पण तुम्हाला अशा भाजीबाबत माहीत आहे का जी 85 हजार रूपये ते 1 लाख रूपये किलो विकली जाते. आज अशाच भाजीबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही भाजी इतकी महाग का आहे आणि तिचे फायदे काय आहेत?
औषध म्हणून केला जातो वापर
आम्ही ज्या भाजीबाबत तुम्हाला सांगत आहोत तिचं वैज्ञानिक नाव 'ह्यूमुलस ल्यूपुलस' आहे. या भाजीला 'हॉप शूट' किंवा 'हॉप कोन्स' नावानेही ओळखलं जातं. काही रिपोर्ट्सनुसार, ही भाजी मुख्यपणे यूरोप आणि उत्तर अमेरिकेत मिळते. असं सांगण्यात येतं की, ही भाजी फुलाच्या झाडाची एक प्रजाती आहे. या भाजीचं झाड 6 मीटर वाढू शकतं आणि 20 वर्ष जगतं.
हॉपशूट या भाजीची कापणी करण्यासाठी म्हणजे ही भाजी तयार होण्यासाठी तीन वर्षाचा वेळ लागतो. तसेच याच्या कापणीसाठी मोठं शारीरिक श्रम करावं लागतं. कापणी करताना फार काळजी घ्यावी लागते. या कारणाने याची किंमतीही जास्त राहत असेल. ही भाजी जगातली सगळ्यात महाग भाजी मानली जाते.
या भाजीमध्ये अनेक औषधी गुण आहेत. तसेच या भाजीच्या फुलांचा वापर बीअर तयार करण्यासाठी केला जातो. याचा वापर बीअर मेकिंगमध्ये स्टेबिलिटी एजंट म्हणून केला जातो. एका मेडिकल स्टडीनुसार, हे समोर आलं की, याची भाजी टीबी विरोधात अॅंटीबॉडी तयार करू शकते. सोबतच एंग्जाइटी, अस्वस्थता, तणाव, उत्तेजना, घबराहट आणि चिड़चिड़पणा यावर याने उपचार करता येतात.
भारतात ही भाजी खास ऑर्डर करून मागवली जाते. अनेक रिसर्चमधून समोर आलं आहे की, याच्या सेवनाने अनेक फायदे मिळतात. ज्यामुळेच या भाजीची किंमत खूप जास्त असते.
कॅन्सरसोबत लढण्याची शक्ती वाढते
2018 करण्यात आलेल्या एका शोधानुसार, हॉप्स शरीरात कॅन्सरसोबत लढण्याची शक्ती वाढवते. हॉप्समध्ये xanthohumol नावाचं तत्व असतं. ज्यामुळे कॅन्सरला रोखलं जाऊ शकतं.
ब्लड सर्कुलेशन सुधारतं
हॉप्समधील तत्वांमध्ये अॅंटी-रेस्टेनोटिक प्रभाव असतो. म्हणजे याने रक्तवाहिन्या रिलॅक्स करण्यास आणि ब्लड सर्कुलेशन सुधारण्यास मदत मिळते.
मांसपेशींच्या वेदनेत आराम
हॉप्समध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी भरपूर असतात. त्यामुळे याच्या सेवनाने मांसपेशींमध्ये वेदना आणि अंगदुखी या समस्या दूर होतात.
एंटीऑक्सीडेंट आजारांना दूर ठेवतात
एका शोधानुसार, यात अॅंटी-ऑक्सिडेंट तत्व असतात जे चिंता, तणाव, टेंशन, अस्वस्थता, घाबरलेपणा आणि चिडचिडपणा या समस्या दूर करतात.