शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

मूग डाळीचं पाणी सेवन करण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्, जाणून घ्या कसं कराल तयार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2022 16:10 IST

याने डेंग्यूसारख्या आजाराचा धोकाही कमी केला जाऊ शकतो. चला जाणून घेऊ मूगाच्या डाळीचं पाणी तयार करण्याची पद्धत आणि त्यापासून होणारे फायदे....

मूगाची डाळ खाणं जवळपास सर्वांनाच पसंत असतं. ही डाळ केवळ चवीलाच चांगली असते असं नाही तर याने आरोग्यालाही खूप फायदा होतो. मूगाच्या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. त्यासोबतच मूग डाळीमध्ये मॅग्नीज, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, फॉलेट, कॉपर, झिंक आणि व्हिटॅमिन्ससारखे पोषक तत्व असतात. त्यामुळे या डाळीच्या सेवनाने शरीरातील पोषक तत्वांची कमतरता भरून काढता येते. डाळीसोबतच या डाळीचं पाणी सेवन केल्यासही अनेक फायदे होतात. याने डेंग्यूसारख्या आजाराचा धोकाही कमी केला जाऊ शकतो. चला जाणून घेऊ मूगाच्या डाळीचं पाणी तयार करण्याची पद्धत आणि त्यापासून होणारे फायदे....

मूग डाळीच्या पाण्यातील पोषक तत्वांचं प्रमाण

एक कप मूग डाळीच्या पाण्यात प्रोटीन १४ ग्रॅम, फॅट १ ग्रॅम, फायबर १५ ग्रॅम, फॉलेट ३२१ मायक्रोग्रॅम, शुगर ४ ग्रॅम, कॅल्शिअम ५५ मि.लि., मॅग्नेशिअम ९७ मिली, झिंक ७ मिलि असतं. त्यासोबतच या डाळीच्या पाण्यात व्हिटॅमिन बी१, बी५, बी६, थियामिन, डायटरी फायबर आणि रेजिस्टेंट स्टार्चही भरपूर असतं. त्यामुळे या डाळीतून शरीराला भरपूर पोषक तत्व मिळतात. ज्याने तुम्ही वेगवेगळ्या आजारांचा धोका कमी करू शकता.

मूग डाळीचं पाणी कमी करण्याची पद्धत

मूग डाळीचं पाणी तयार करण्यासाठी एका प्रेशर कुकरमध्ये दोन कप पाणी गरम करा. या गरम पाण्यात मूग डाळ टाका आणि चवीनुसार मिठ टाकून साधारण २ ते ३ शिट्या होईपर्यंत शिजवा. त्यानंतर डाळ चांगली बारीक करा. यातील पाणी वेगळं काढा. तुमचं डाळीचं पाणी पिण्यासाठी तयार आहे. 

लठ्ठपणा कमी करण्यासाठी

अनियमित दिनचर्या आणि व्यस्तता यामुळे व्यक्तींना आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो आहे. या समस्यांमध्ये लठ्ठपणा सर्वात जास्त बघायला मिळते. जर तुम्हीही लठ्ठपणाने हैराण असाल तर मूगाच्या डाळीचं सेवन करू शकता. या डाळीमध्ये कॅरीचं प्रमाण कमी आणि फायबर अधिक असतं. तसेच मूग डाळीच्या पाण्याने मेटाबॉलिज्मही बूस्ट होतं. याने वजन कमी करण्यास मदत मिळते.

बॉडी डिटॉक्स करण्यासाठी

मूग डाळीचं पाणी नियमित सेवन केल्याने शरीरातील विषारी तत्व बाहेर काढण्यास मदत मिळते. याने शरीराची आतून स्वच्छता होते. सोबतच डाळीचं पाणी प्यायल्याने लिव्हर, गॉल ब्लॅडर, रक्त आणि  आतड्यांची स्वच्छताही होते.

डायबिटीसमध्ये फायदेशीर

मूग डाळीचं पाणी शरीरात इन्सुलिनचं प्रमाण वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. त्यासोबतच मूग डाळ ब्लड ग्लूकोजला नियंत्रित ठेवण्यासही मदत करते. ज्याने डायबिटीस नियंत्रित ठेवण्यासही मदत मिळते.

डेंग्यूपासून बचाव

डेंग्यू डास चावल्याने होणारा एक गंभीर आजार आहे. अलिकडे तर या आजाराने सगळीकडेच थैमान घातलं आहे. अशात मूगाच्या डाळीचं पाणी सेवन केल्याने तुम्हाला फायदा होऊ शकतो. या डाळीचं पाणी सेवन करून इम्यून सिस्टम बूस्ट होतं, ज्याने डेंग्यूसारख्या गंभीर आजारापासून बचाव केला जाऊ शकतो.

लहान मुलांसाठी फायदेशीर

मूग डाळीच्या पाण्यात अनेकप्रकारचे पोषक तत्व असतात, जे लहान मुलांसाठी फार फायदेशीर असतात. सर्वात खास बाब ही आहे की, या डाळीचं पाणी सहजपणे पचतं. या डाळीने लहान मुलांची इम्यून पॉवर वाढते आणि त्याने रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य