शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

सकाळच्या नाश्त्यात 'या' एका गोष्टीचा करा समावेश, दिवसभर मिळेल एनर्जी अन् निरोगी रहाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 11:41 IST

Moong Sprouts Breakfast : पोटासाठी हे खूप फायदेशीर असतात आणि यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोकाही कमी होतो. मोड आलेले कडधान्य सुपरफूड मानले जातात जे तुम्ही दिवसभर एनर्जी वाढवण्यास मदत करतात. 

Moong Sprouts Breakfast : मोड आलेल्या कडधान्यांमध्ये भरपूर पोषक तत्व असतात. अशात त्यांचं नियमितपणे सेवन करणं आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरतं. एक्सपर्ट्सनुसार, जर तुम्ही रोज सकाळी नाश्त्यात मोड आलेले कडधान्य खाल तर शरीराला खूप फायदे मिळतील. पोटासाठी हे खूप फायदेशीर असतात आणि यामुळे अनेक गंभीर आजारांचा धोकाही कमी होतो. मोड आलेले कडधान्य सुपरफूड मानले जातात जे तुम्ही दिवसभर एनर्जी वाढवण्यास मदत करतात. 

एनसीबीआयनुसार, मोड आलेल्या कडधान्यांमध्ये वेगवेगळे व्हिटॅमिन्स, अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स, कॅल्शिअम, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम, आयर्न आणि झिंक भरपूर प्रमाणात असतं. अशात जाणून घेऊया सकाळी नाश्त्यात मोड आलेले मूग खाण्याचे फायदे...

पोषणाचा खजिना मूग

मूग फार पौष्टिक मानले जातात. कारण यात व्हिटॅमिन ए, बी, सी आणि ई चं प्रमाण अधिक असतं. सोबतच पोटॅशिअम, आयर्न, कॅल्शिअमही मूगात आढळतात. याचे सेवन केल्यास शरीरात कॅलरीज वाढत नाहीत. जर मोड आलेल्या मुगाचे सेवन केल्यास शरीरात केवळ 30 कॅलरी आणि 1 ग्रॅम फॅट पोहोचतात. 

मोड आलेल्या मूगात मॅग्नेशिअम, कॉपर, फोलेट, रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन, व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशिअम यांसारखे आणखीही काही खास पौष्टिक तत्व आढळतात. यात भरपूर प्रमाणात एमिनो अ‍ॅसिड आणि पॉलिफेनॉल्ससारखे तत्व आढळतात. याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होतात.

1) ब्लड ग्लूकोज होतं कमी

मोड आलेले मूग खाल्यास शरीरात इन्सुलिन लेव्हल वाढण्यात मदत मिळते. यासोबतच याने ब्लड ग्लूकोजही कंट्रोलमध्ये राहतं. याने डायबिटीसची समस्या कमी करण्यास मदत होते. 

2) रोगप्रतिकार शक्ती वाढते

मूगातील काही पोषक तत्वांमुळे रोगप्रतिकारक शक्ती कमी वाढते. याने वेगवेगळ्या आजारांशी लढण्याची शक्ती वाढते. यातील अ‍ॅंटी-मायक्रोबियल आणि अ‍ॅंटी-इंफलामेंट्री गुण असतात ज्याने शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते. 

3) पचनक्रिया चांगली राहते

मोड अलेल्या मूगामध्ये शरीरातील टॉक्सिक बाहेर काढण्यास मदत होते. याचे सेवन केल्यास शरीरातील विषारी पदार्थ-द्रव्य कमी होतात. यासोबतच पचनक्रिया नेहमी चांगली राहते. तसेच पोटासंबंधी आजारही कमी होतात. 

4) त्वचेवर येतो ग्लो

मूगामध्ये सायट्रोजन असतात जे शरीरात कोलेजन आणि एलास्टिन कायम ठेवतात. याने चेहऱ्यावर वय दिसून येत नाही. चेहराही चमकदार राहतो.

5) पोटदुखीपासून आराम

मोड आलेल्या मूगात फायबरचं प्रमाण अधिक असतं. याने पोटाने विकार, पोटदुखणे या समस्या होत नाहीत. तसेच तुम्हाला होणारी बद्धकोष्ठतेची समस्याही लगेच दूर होण्यास मदत मिळते. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य