आवळ्यामध्ये ही गोष्ट टाकून बनवा खास ज्यूस, कोलेस्ट्रॉलसारख्या अनेक समस्या होतील दूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 09:25 IST2023-06-16T09:23:05+5:302023-06-16T09:25:24+5:30
Healthy Juice: आवळा आणि अर्जुन झाडाची साल यांचा ज्यूस, अॅलोवेराचा ज्यूस फायदेशीर मानला जातो. चला जाणून घेऊ या ज्यूसचे फायदे...

आवळ्यामध्ये ही गोष्ट टाकून बनवा खास ज्यूस, कोलेस्ट्रॉलसारख्या अनेक समस्या होतील दूर
Healthy Juice: आजच्या धावपळीच्या जीवनात निष्काळजीपणामुळे लोकांना वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशात सकाळी फळांचं ज्यूस पिणं फार फायदेशीर मानलं जातं. डॉक्टर सल्ला देतात की, जर तुम्ही रोज एक ज्यूस जरी प्यायले तरी अनेक आजारांचा धोका कमी होतो किंवा एखादी समस्या झाली असेल तर ती दूर होऊ शकते. आवळा आणि अर्जुन झाडाची साल यांचा ज्यूस, अॅलोवेराचा ज्यूस फायदेशीर मानला जातो. चला जाणून घेऊ या ज्यूसचे फायदे...
कसा कराल आवळा आणि अर्जुन झाडाच्या सालीचा ज्यूस
सगळ्यात आधी तर आवळ्याचे छोटे छोटे तुकडे करा आणि ते ब्लेंडरमध्ये बारीक करा. त्यानंतर त्यातील गर आणि ज्यूस वेगळा करा. त्यानंतर एका भांड्यात 2 कप पाणी टाका आणि पाणी उकडून घ्या. त्यात अर्जुन झाडाच्या सालीचा एक तुकडा टाका. पाणी अर्धा होईपर्यंत उकडा. त्यानंतर या पाण्यात आवळ्याचा रस टाका. त्यानंतर यात थोडं मध टाकून चांगलं मिक्स करा. हा ज्यूस थंड होऊ द्या. जर या ज्यूसचं तुम्ही रोज सेवन केलं तर तुम्हाला लवकर प्रभाव दिसू लागेल.
हा ज्यूस पिण्याचे फायदे
आवळा आणि अर्जुन झाडाच्या सालीचा ज्यूस पिण्याचे अनेक फायदे मिळू शकतात. या ज्यूसने शरीराला व्हिटॅमिन सी, अॅंटी-ऑक्सिडेंट आणि फायटोकेमिकल्स मिळतात. ज्यांनी आपल्या आरोग्यात सुधारणा होते.
इम्यूनिटी म्जबूत होते
आवळा आणि अर्जुन झाडाच्या सालीचा ज्यूस पिऊन अॅंटी-ऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन सी मिळतं. ज्यामुळे शरीराची इम्यूनिटी मजबूत होण्यास मदत मिळते. असं झालं तर तुम्हाला वेगवेगळ्या रोगांसोबत लढण्यास मदत मिळळे.
हृदय राहतं निरोगी
अर्जुनाच्या सालीमध्ये असलेल्या फायटोकेमिकल्स हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत मिळते. जसे की, ब्लड प्रेशर नियंत्रित ठेवणे आणि हृदयाची संवेदनशीलता वाढवणे.