Health Alert : पुरुषांच्या तुलनेत महिलांना दमा होण्याची शक्यता अधिक !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2017 17:48 IST
एका नव्या संशोधनात आढळलेल्या निष्कर्षानुसार स्त्रियांच्या शरीरातील टेस्टेस्टेरॉनची कमी असलेली पातळी त्यांना पौगंडावस्थेनंतर दमा होण्याची शक्यता वाढण्यास कारणीभूत ठरते.
Health Alert : पुरुषांच्या तुलनेत महिलांना दमा होण्याची शक्यता अधिक !
फ्रान्समध्ये झालेल्या एका नव्या संशोधनात आढळलेल्या निष्कर्षानुसार स्त्रियांच्या शरीरातील टेस्टेस्टेरॉनची कमी असलेली पातळी त्यांना पौगंडावस्थेनंतर दमा होण्याची शक्यता वाढण्यास कारणीभूत ठरते. या संशोधनानुसार पुरुषांमधील प्राथमिक लैंगिक हॉर्मोन्स अॅलर्जी रोखण्यास उपयोगी ठरतात. त्यामुळे पुरुषांमध्ये असलेल्या टेस्टेस्टेरॉन हॉर्मोनमुळे त्यांना दमा होण्याची शक्यता कमी असते. दम्याला कारणीभूत ठरणाऱ्या लिम्फोसाईट आयएलसी-२एस पेशींची वाढ टेस्टेस्टेरॉनच्या उपस्थितीमुळे खुंटते. यामुळे व्यक्तीचे दम्यापासून संरक्षण होते. टेस्टेस्टेरॉन हॉर्मोनच्या उपस्थितीमुळे पुरुषांना दम्याचा त्रास कमी होतो, ही बाब लक्षात घेता स्त्रियांसाठीही भविष्यात दम्यावर नवीन उपचार पद्धती शोधणे सोपे ठरू शकते.