शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

तीव्रतेनं जाणवणारी डोकेदुखीसुद्धा असू शकते कोरोनाचं लक्षण; सामान्य त्रास की कोरोनाचं लक्षण?, असं ओळखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 11:16 IST

CoronaVirus News & Latest Updates : जे लोक कोरोना संक्रमणाचा सामना करतात. त्यांना तीव्र डोकेदुखीचा सामना करावा लागतो. दरम्यान व्हायरल इन्फेक्शन, सर्दी, एलर्जी किंवा इतर समस्या असतील तरी डोकेदुखीची समस्या उद्भवते.

डोकेदुखी कोरोना व्हायरसच्या सामान्य लक्षणांपैकी एक आहे. कोरोनाचं संक्रमण झाल्यानंतर ताप, वास न येणं, श्वास घ्यायला त्रास होणं, डोकेदुखी अशी लक्षणं दिसायला सुरूवात होते. जे लोक कोरोना संक्रमणाचा सामना करतात. त्यांना तीव्र डोकेदुखीचा सामना करावा लागतो. दरम्यान व्हायरल इन्फेक्शन, सर्दी, एलर्जी किंवा इतर समस्या असतील तरी डोकेदुखीची समस्या उद्भवते.

कोरोना रुग्णांमध्ये संक्रमणाच्या सुरूवातील डोकेदुखीची समस्या दिसून येते. दीर्घकाळ ही समस्या असेल तर गंभीर लक्षणांमध्ये याचे रूपांतर होऊ शकते. इस्तंबूल विद्यापीठात केलेल्या अभ्यासात, तुर्कीच्या संशोधकांच्या पथकाने कोरोना विषाणूची लागण नसलेले ३१९६ रुग्णआणि कोरोना पॉझिटिव्ह २६२ रुग्णांची तपासणी केली. त्यापैकी कोविड-पॉझिटिव्ह रूग्णांमध्ये डोकेदुखीची समस्या नोंदविली गेली.

७२ तासांपेक्षा अधिक डोकेदुखी

१० टक्क्यांहून अधिक रुग्णांच्या मते, कोरोना झाल्यास त्यांना ७२ तासांपेक्षा जास्त काळ डोकेदुखीची समस्या जाणवत होती. अशा परिस्थितीत हे कोरोनाचे लक्षण असू शकते. कारण सामान्य स्थितीत डोकेदुखी काही वेळानं बरी होते. डॉक्टरांनी देखील याची पुष्टी केली आहे की जर डोके किंवा स्नायूंमध्ये सतत ४८ ते ७२ तास सतत वेदना असतील तर ते कोरोनाचे लक्षण असू शकते. म्हणजेच सर्दी, ताप, खोकला तसंच डोकेदुखी हे कोरोनाच्या लक्षणांपैकी एक असू शकते.

असा ओळखा सामान्य आणि कोरोनामुळे होत असलेल्या डोकेदुखीतला फरक

कोरोना संक्रमणामुळे होत असलेली डोकेदुखी आणि इतर कारणांमुळे होणारी डोकेदुखी यात फरक दिसून येतो. कोरोनामुळे डोकेदुखी होत असेल तर पोटात दुखण्याची समस्या उद्भवते. ओटीपोटात वेदना होतात. सामान्य डोकेदुखीच्या समस्येत असा प्रकार दिसून येत नाही. कोरोना व्हायरसचं संक्रमण झाल्यानंतर डोकेदुखीबरोबरच वास न येणं, उलटी, थकवा, भूक कमी लागणं, चव न समजणं अशा समस्या उद्भवतात. मृत्यूचं कारण ठरू शकतं नाकातील केस कापणं; तुम्हीसुद्धा असंच करत असाल तर वेळीच सावध व्हा

सामान्य डोकेदुखीमध्ये पेनकिलर्सने आराम मिळतो. पण जर कोरोनाचं संक्रमण झालं असेल तर पेनकिलर्सनेही आराम वाटत नाही. अशा स्थितीत लवकरात लवकर डॉक्टरांशी संपर्क केल्यास योग्यवेळी उपचार घेता येऊ शकतात. अभ्यासांनुसार पुरुषांमध्ये कोरोनामुळे होत असलेल्या डोकेदुखीच्या वेदना महिलांच्या तुलनेत दुप्पट असू शकते. एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की पुरुषांपेक्षा महिलांमध्ये  हे प्रमाण जास्त आहे. 'या' समस्यांवर रामबाण उपाय धण्याचे पाणी; रात्री भिजवून सकाळी प्याल तर आजारांपासून राहाल लांब  

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्यcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या