चुकुनही ट्राय करु नका 'ही' फुड कॉम्बिनेशन्स, आयुष्यभर जीवघेणे रोग पाठ सोडणार नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2021 17:14 IST2021-11-10T17:14:31+5:302021-11-10T17:14:48+5:30
काही पदार्थ एकत्र खाल्ल्यानेही तुम्ही आजारी पडू शकता. आयुर्वेदिक फिजिशियन डॉ. दीक्षा भावसार यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये शरीरासाठी हानिकारक फूड कॉम्बिशनची (food combinations) माहिती दिली आहे.

चुकुनही ट्राय करु नका 'ही' फुड कॉम्बिनेशन्स, आयुष्यभर जीवघेणे रोग पाठ सोडणार नाहीत
खाण्याच्या सवयींचा मानवी आरोग्यावर परिणाम स्पष्टपणे दिसून येतो. तुम्हाला माहीत आहे का की, काही आरोग्यदायी गोष्टी एकत्र खाणं (food combinations) आपल्या हेल्थसाठी खूप धोकादायक आहे. काही पदार्थ एकत्र खाल्ल्यानेही तुम्ही आजारी पडू शकता. आयुर्वेदिक फिजिशियन डॉ. दीक्षा भावसार यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये शरीरासाठी हानिकारक फूड कॉम्बिशनची (food combinations) माहिती दिली आहे.
दूध आणि फळे -
केळीचा शेक लोकांमध्ये खूप सामान्य आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, की फळांसोबत दुधाचे मिश्रण आपल्या आरोग्याला हानी पोहोचवते. केळी हे दूध, दही किंवा ताकासोबत कधीही खाऊ नये, असे तज्ज्ञ सांगतात. दूध आणि केळीच्या या मिश्रणामुळे सर्दी, खोकला किंवा अॅलर्जी होऊ शकते.
तूप आणि मध समान प्रमाणात नको -
तूप आणि मध समान प्रमाणात कधीही सेवन करू नये. यामुळे शरीराचे नुकसान होऊ शकते. मध नैसर्गिकरित्या गरम आणि कोरडा आहे, तर तूप त्याच्या थंड आणि मॉइश्चरायझिंग गुणवत्तेसाठी ओळखले जाते. जर तुम्ही तूप आणि मध मिसळून खात असाल तर यापैकी एकाचे प्रमाण जास्त ठेवा.
दही किंवा पनीर-
हिवाळ्यात दही, चीज किंवा यॉगर्ट यांसारख्या गोष्टी खाणे खूप फायदेशीर मानले जाते. पण रात्रीच्या वेळी अशा गोष्टी खाणे टाळावे. दही इन्फ्लेमेशन आणि रक्त, पित्त, कफ यांच्याशी संबंधित समस्या निर्माण करू शकते. ज्या लोकांची पचनक्रिया खराब असते, त्यांना पनीरमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. त्याचप्रमाणे मध कधीही गरम करून खाऊ नये. हे आपल्या पचनसंस्थेला आधार देणारे एंजाइम मारून टाकतात.