शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
2
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
3
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
4
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
5
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
6
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
7
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
8
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
9
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
10
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
11
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
12
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
13
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
14
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
15
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
16
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
17
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
20
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प

मुलं परीक्षेचं टेंशन घेत असतील, तर सेलिब्रिटींचे 'हे' अनुभव नक्कीच उपयोगी येतील...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 5:23 PM

परीक्षेचा कालावधी विद्यार्थ्‍यांसाठी अत्‍यंत तणावग्रस्‍त काळ ठरू शकतो आणि शांतचित्त मन व नियोजित दृष्टिकोनामुळे परीक्षा देणे सोपे जाते.

(image credit- the conversation)

फेब्रुवारी महिना येताच भारतभरातील अनेक घरांमध्‍ये परीक्षेच्‍या तयारीची लगबग सुरू होते. इयत्ता १०वी किंवा १२ वीच्‍या बोर्ड परीक्षा देणारा मुलगा, मुलगी, भाचा किंवा भाची असो, या महिन्‍यादरम्‍यान अनेक कुटुंबांचे लक्ष फक्‍त शैक्षणिक वर्षाच्‍या अंतिम परीक्षेवर असते.

परीक्षेच्‍या कालावधीदरम्‍यान विद्यार्थ्‍यांचे त्‍याचे आरोग्‍य व स्‍वाथ्‍याकडे दुर्लक्ष होणे स्‍वाभाविक आहे, कारण ते परीक्षेच्‍या तयारीमध्‍ये खूपच गुंतून गेलेले असतात. परीक्षेसाठी तयारी करण्‍याचा दबाव असताना देखील पुरेशी झोप मिळणे, अधूनमधून अभ्‍यासातून मोकळा वेळ काढणे आणि हे सर्व करत असताना त्‍याच्‍या किंवा तिच्‍या आरोग्‍यावर लक्ष ठेवणे अत्‍यंत महत्त्‍वाचे आहे. वेळेवर योग्‍य आहार, नियोजित स्‍नॅक ब्रेक्‍स आणि आरोग्‍यकारक आहाराचे सेवन यामुळे परीक्षेच्‍या  कालावधीदरम्‍यान शरीराला ऊर्जा मिळण्‍यासोबत ते स्‍वस्‍थ राहू शकते.  

परीक्षेच्‍या कालावधीदरम्‍यान विद्यार्थ्‍यांसाठी उत्तम पदार्थ म्‍हणजे बदाम. परीक्षेच्‍या तयारीच्‍या कालावधीदरम्‍यान बदामांचे सेवन केल्‍याने विद्या‍र्थ्‍यांच्‍या जीवनामध्‍ये आरोग्‍यदायी बदल घडून येण्‍यामध्‍ये मदत होऊ शकते. आयुर्वेद व उनानी सांगतात की बदामांच्‍या सेवनामुळे मेंदू, चेताउतींना उत्तम पोषण मिळते आणि बुद्धी वाढते, जे परीक्षेच्‍या वेळी उपयुक्‍त ठरू शकते. 

प्रमुख बॉलीवूड अभिनेत्री सोहा अली खान म्‍हणाली, ''परीक्षेचा कालावधी विद्यार्थ्‍यांसाठी अत्‍यंत तणावग्रस्‍त काळ ठरू शकतो आणि शांतचित्त मन व नियोजित दृष्टिकोनामुळे परीक्षा देणे सोपे जाते. मला आठवते, मी शाळेत असताना माझ्या आईने परीक्षेदरम्‍यानच्‍या तयारीकरिता माझ्यासाठी आहारासंदर्भात नियोजन आणि स्‍नॅकिंग नित्‍यक्रम तयार केला होता. ज्‍यामुळे मला दिवसभर उत्तमरित्‍या पोषण मिळू शकेल, याची तिने काळजी घेतली. याव्‍यतिरिक्‍त तिने माझ्या अभ्‍यासाच्‍या टेबलवर नेहमी बदाम असण्‍याची देखील खात्री घेतली. ज्‍यामुळे मला भूक लागली किंवा दीर्घकाळ अभ्‍यास केल्‍यानंतर कंटाळवाणे वाटले तर आरोग्‍यदायी स्‍नॅक जवळच ठेवण्‍यात आले होते.'' 

फिटनेस प्रेमी व सुपरमॉडेल मिलिंद सोमण म्‍हणाला, ''परीक्षेच्‍या कालावधीदरम्‍यान विद्यार्थ्‍यांचे त्‍यांचे आरोग्‍य व फिटनेसकडे दुर्लक्ष होते. योग्‍य व्‍यायाम वेळापत्रक राखणे अवघड होऊन जाते. विद्यार्थी अभ्‍यासामधून दर अर्ध्‍या तासाने नियमितपणे वेळ काढत त्‍यांच्‍या फिटनेसकडे लक्ष देऊ शकतात. त्‍यामध्‍ये घराच्‍याभोवती असलेल्‍या परिसरामध्‍ये थोड्या कालावधीसाठी चालणे किंवा चालता-चालता अभ्‍यास करणे अशा गोष्‍टींचा समावेश असू शकतो. विद्यार्थ्‍यांनी त्‍यांना सक्रिय ठेवणारी गोष्‍ट केलीच पाहिजे. बदामांसारख्‍या आरोग्‍यदायी आहार व स्‍नॅक्‍सचे सेवन हे महत्त्‍वाचे आहे. यामुळे परीक्षेदरम्‍यान आरोग्‍यदायी नित्‍यक्रम राखण्‍यामध्‍ये आणि विद्यार्थ्‍यांच्‍या वजनावर नियंत्रण ठेवण्‍यामध्‍ये मदत होऊ शकते.'' 

दिल्‍ली येथील मॅक्‍स हेल्‍थकेअरच्‍या आहारविभागाच्‍या प्रादेशिक प्रमुख रितिका समद्दर म्‍हणाल्‍या, ''माझ्याकडे अनेकदा खासकरून परीक्षेच्‍या कालावधीदरम्‍यान मुलांसाठी योग्‍य आहारासंदर्भात सल्‍ला घेण्‍यासाठी चिंताग्रस्‍त पालक येतात. मी त्‍यांना नेहमीच बदामांसारखे नट्स जवळ ठेवण्‍यास सांगते. ते ऊर्जा देतात, जी उत्तम अवधान राखण्‍यामध्‍ये मदत करू शकते. बदामांचे सेवन केल्‍याने मुलांच्‍या वजनावर नियंत्रण ठेवण्‍यामध्‍ये देखील मदत होऊ शकते. युरोपियन जर्नल ऑफ क्लिनिकल न्‍यूट्रिशनमध्‍ये प्रकाशित करण्‍यात आलेल्‍या अहवालानुसार दररोज ४३ ग्रॅम सुके, भाजलेले, काहीशा खारट बदामांचे सेवन केलेल्‍या सहभागींना भूक कमी लागण्‍याचे आढळून आले आणि त्‍यांच्‍या शरीराचे वजन न वाढता आरोग्‍यदायी जीवनसत्त्‍व ई आणि मोनोसॅच्‍युरेटेड (''उत्तम'') फॅटचे सेवन देखील वाढले. ''  

पिलेट्स तज्ञ आणि आहार व पोषण सल्‍लागार माधुरी रुईया म्‍हणाल्‍या, ''परीक्षेसाठी तयारी करणा-या कोणत्‍याही विद्यार्थ्‍यासाठी दिवसभर ऊर्जेचा पुरवठा करणे हे त्‍याचे/तिचे अभ्‍यासातील अवधान निरंतर ठेवण्‍यासाठी महत्त्‍वाचे आहे. बदामांच्‍या नियमित सेवनामुळे तुम्‍ही उत्‍साही राहता आणि मी विद्यार्थ्‍यांच्‍या जवळ लहान डब्‍यामध्‍ये किंवा टिफिनमध्‍ये मूठभर सुके, भाजलेले किंवा मसालेदार बदाम ठेवण्‍याचा सल्‍ला देते. ज्‍यामुळे त्‍यांना परीक्षेच्‍या तयारीदरम्‍यान आरोग्‍यदायी स्‍नॅक सेवन करता येऊ शकेल.'' पोषण व स्‍वास्‍थ्‍य सल्‍लागार शीला कृष्‍णास्‍वामी म्‍हणाल्‍या, ''परीक्षेदरम्‍यान विद्यार्थ्‍यांना भोजन कालावधीच्‍या दरम्‍यान भूक लागणे स्‍वाभाविक आहे. यामुळे ते अनारोग्‍यकारक पदार्थांचे सेवन करण्‍याची शक्‍यता निर्माण होते. परीक्षा कालावधीदरम्‍यान अनारोग्‍यकारक पदार्थांचे सेवन कमी करण्‍यासाठी पालक व शिक्षक खात्री घेऊ शकतात की विद्यार्थी भोजनांदरम्‍यानच्‍या कालावधीमध्‍ये पुरेसे स्‍नॅक्‍स ब्रेक्‍स घेत आहेत. या ब्रेक्‍ससाठी बदाम हे उत्तम स्‍नॅक आहे. ते सुलभपणे उपलब्‍ध होतात आणि चविष्‍ट देखील आहेत.

तसेच ते कोणत्‍याही भारतीय मसालेदार पदार्थांसोबत सेवन करता येतात. याव्‍यतिरिक्‍त बदामांमध्‍ये भूक शमवण्‍याचे गुण देखील आहे. ज्‍यामुळे बदामांचे सेवन केल्‍याने पोट भरल्‍यासारखे वाटते. तसेच बदामांच्‍या सेवनामुळे भोजनादरम्‍यानच्‍या कालावधीमध्‍ये मुलांच्‍या भूकेचे समाधान होते आणि तो किंवा ती अनारोग्‍यकारक स्‍नॅक्‍सच्‍या सेवनापासून दूर राहू शकतो/शकते.'' तर मग बदामांच्‍या आरोग्‍यदायी पोषणासह परीक्षेसाठी योग्‍य नियोजन व तयारी करा. 

टॅग्स :Healthआरोग्यStudentविद्यार्थी